शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनामुळे ३० कारखाने बंदच, साखर उत्पादन ६ लाख टनांनी घटले

By नितीन चौधरी | Updated: November 23, 2023 18:45 IST

एक नोव्हेंबरला सुरू झालेल्या साखर हंगामात आतापर्यंत केवळ ८ लाख टन साखर उत्पादन झाले असून गेल्या वर्षी याच २३ दिवसांच्या काळात सुमारे १४ लाख टन साखर उत्पादन झाले होते

पुणे : ऊस दरवाढीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेले आंदोलन कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात पेटले असून परिणामी राज्यातील साखर उत्पादन घटले आहे. एक नोव्हेंबरला सुरू झालेल्या साखर हंगामात आतापर्यंत केवळ ८ लाख टन साखर उत्पादन झाले असून गेल्या वर्षी याच २३ दिवसांच्या काळात सुमारे १४ लाख टन साखर उत्पादन झाले होते. ऊसदराच्या आंदोलनामुळे अद्याप ३० कारखाने सुरू झालेले नाहीत. त्यामुळे साखर उत्पादनात ६ लाख टनांची घट झाली आहे. 

राज्यातील ऊस गाळपहंगाम यंदा एक नोव्हेंबर रोजी सुरू झाला मात्र, ऊस दराबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील काही साखर कारखाने अद्याप सुरू होऊ शकलेले नाही. परिणामी साखर उत्पादनही घटले आहे. गेल्या वर्षी राज्यात २३ नोव्हेंबरपर्यंत ९१ सहकारी व ९२ खाजगी असे १८३ कारखाने सुरू झाले होते. या कारखान्यांनी १६६ लाख टन उसाचे गाळप करून १४ लाख टन साखरेचे उत्पादन केले होते. तर सरासरी साखर उतारा ८.४ टक्के होता. मात्र, यंदा शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे आतापर्यंत ७६ सहकारी व ७८ खासगी असे एकूण १५४ कारखाने सुरू होऊ शकले आहेत. अर्थात गेल्या वर्षाच्या तुलनेत २९ कारखान्यांचे उत्पादन सुरू झालेले नाही. सुरू झालेल्या कारखान्यांनी आतापर्यंत १०५ लाख टन ऊसगाळप केले असून त्यातून ८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. तर सरासरी साखर उतारा ७.६१ टक्के मिळाला आहे. आंदोलन सुरू असलेल्या कोल्हापूर विभागात १४ सहकारी व ८ खासगी कारखान्यांनी मिळून केवळ १४ लाख टन उसाचे गाळप केले असून त्यातून १.१६ लाख टन साखरेचे उत्पादन होऊ शकले आहे.

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेagitationआंदोलनGovernmentसरकारSocialसामाजिक