शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

वरिष्ठांच्या जाचामुळे संख्येंचा मृत्यू? संघटनेचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 04:19 IST

ग्रामविकास अधिकारी जयप्रकाश संखे यांचा नुकताच झालेला मृत्यू हा पालघर पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेले विस्तार अधिकारी (ग्रापं.) राजेश पाटील करीत असलेल्या जाचामुळे व ते करीत असलेल्या सततच्या अर्थपूर्ण मागणीमुळे झाला असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने करून त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

- पंकज राऊतबोईसर  - ग्रामविकास अधिकारी जयप्रकाश संखे यांचा नुकताच झालेला मृत्यू हा पालघर पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेले विस्तार अधिकारी (ग्रापं.) राजेश पाटील करीत असलेल्या जाचामुळे व ते करीत असलेल्या सततच्या अर्थपूर्ण मागणीमुळे झाला असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने करून त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.कारवाई न केल्यास २० जून पासून लेखणी बंद करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. दिवंगत संखे यांचा त्यांच्या पत्नीनेही मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे.महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे पालघर तालुक्याचे अध्यक्ष रविंद्र पाटील व सचिव मयुर पाटील यांनी पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना १२ जून रोजी दिलेल्या निवेदनात राजेश पाटील यांनी बोईसर ग्रामपंचायतीच्या एका जुुन्या प्रकरणाबाबत पदाधिकाºयांना चुकीचे मार्गदर्शन करून ते प्रकरण चिघळवून सतत आर्थिक मागणी करणे, नोटिसा काढणे, चुकीचे अहवाल पाठवून सतत आर्थिक व मानसिक छळ करणे असे प्रकार जयप्रकाश संखे यांच्या बाबतीत केल्याने संखे यांच्या मृत्यूला पाटील हेच जबाबदार असून त्यांनी त्यांचा बळी घेतल्याचा आरोप केला आहे.तर सदर ग्रामपंचायतीचे लेखा परिक्षण झालेले असतांनाही त्यांनी जाणीपूर्वक आर्थिक फायद्यासाठी संख्येना त्यामध्ये गोवून त्यांचा बळी घेतलेला आहे. तर बोईसर ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात पाटील विस्तार अधिकारी असतांना तसेच बोईसर प्रकरणामध्ये ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक असतांनाही त्यांनी कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन न करता चुकीचे कृत्य करून स्वत:ची जबाबदारी दुसºयावर झटकून फक्त आर्थिक फायद्यासाठीच पिळवणूक करून या ग्रामविकास अधिकाºयाचा बळी घेतला आहे असे निवेदनात उल्लेख आहे.तसेच विस्तार अधिकारी पाटील हे जे ग्रामसेवक त्यांच्या मर्जीप्रमाणे वागत नाहीत त्यांच्या विरोधात पदाधिकाºयांना भडकावून तक्रारी देण्यास सांगतात व त्या प्राप्त झाल्यावर त्यांच्यावर नोटिसा बजावणे, आरोपपत्र दाखल करणे, गुन्हे दाखल करणे अशा पध्दतीने मानसिक त्रास देवून स्वत:चा आर्थिक फायदा करून घेण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. त्यामुळे कार्यरत ग्रामसेवकांचे मानसिक संतुलन बिघडते आहे. अशा मुजोर विस्तार अधिकाºयाचा कार्यभार काढून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करून सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी संघटनेने केली आहे. या आरोपा संदर्भात विचारण्या करीता विस्तार अधिकारी पाटील यांचेशी मोबाईल वर कॉल करून व टेक्स मेसेज द्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क झाला नाही .पत्नीनेही केले गंभीर आरोपदिवंगत संखे यांची पत्नी जान्हवी यांनीही पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकºयांना निवेदन देऊन राजेश पाटील हे माझे पती जयप्रकाश संखे यांना वारंवार फोन करीत होते त्यांचे मानसिक संतुलन बिघडेल असा छळ केल्याचा आरोप करून माझा संसार त्यामुळे उघड्यावर पडला आहे. त्यास सर्वस्वी राजेश पाटील जबाबदार आहेत असा आरोप करून कारवाई ची मागणी केली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnewsबातम्या