शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
2
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
3
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
4
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
5
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
6
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
7
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
8
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
9
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
10
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
11
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
12
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
13
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
14
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
16
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
17
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
18
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
19
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
20
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

‘त्याने’ दाखविलेल्या सतकर्तमुळे ‘काळा’नेही पत्करली सपशेल शरणागती.. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 12:15 PM

स्वत:चा जीव धोक्यात घालून प्रसंगावधानता बाळगल्यामुळे कोल्हापूर डेपोच्या नाशिक कोल्हापूर या शिवशाही गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव वाचवुन त्याने मोठा अपघात टाळला.  

ओझर : काळ आला होता परंतु वेळ आली नव्हती अशा जीवघेण्या प्रसंगातुन एका तरुणाने स्वत:चा जीव धोक्यात घालून प्रसंगावधानता बाळगल्यामुळे कोल्हापूर डेपोच्या नाशिक कोल्हापूर या शिवशाही गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव वाचवुन त्याने मोठा अपघात टाळला.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापुर डेपोची नाशिक - कोल्हापुर  ही (एमएच- 09- एट-1876 ) क्रमांकाची गाड़ी  गुरुवारी (दि.३१) सकाळी सहा वाजता नाशिकवरुन कोल्हापुरला जाण्यासाठी निघाली होती.  ही बस नारायणगावच्या पुढे गाड़ी आलेली असताना जुन्नर येथील नवरंग मेडिकलचे मालक आलोक जंगम या तरुणाने शिवशाही बसच्या मागील डाव्या बाजुच्या चाकाचे बोल्ट निखळलेले पाहिले. आलोकने गंभीर अपघाताचा धोका ओळखून सतर्कता दाखवत चालकाला या गोष्टीची कल्पना देण्यासाठी शिवशाहीचा पाठलाग सुरु केला. भरधाव वेगात असलेल्या शिवशाहीला अखेर एकलहेरे गावाजवळ जीव धोक्यात घालून त्याने थांबविले. तोपर्यंत चाकाचे सहा बोल्ट पूर्ण निखळून गेले होते. चालक, वाहक व प्रवासी यांनी गाडीच्या खाली उतरुन  मागील चाकाची वस्तुस्थिती पाहिल्यावर अक्षरश: त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. एका भयानक अपघातातुन आलोक या तरुणाने आपल्याला  वाचविले तो देवदुताच्या रुपात धावून आला असल्याच्या भावना त्यांनी व गाडीतील प्रवाशांनी व्यक्त केल्या. यावेळी गाडीमधे १७ प्रवाशी होते .
 ..........................आमचे नशीब बलवत्तर म्हणुन आम्ही सर्व  जीवघेण्या अपघातातुन वाचलो   गाड़ी अजुन काही मीटर जरी पुढे  धावली गेली असती तर गाडीचे चाक पूर्ण निखळून  भीषण अपघात झाला असता चाकाचे  फक्त तीन बोल्ट राहिले होते चालक  एस आर भोसले यांनी नाशिक वरुण गाड़ी निघताना चारही चाके सुस्थितित असल्याची खात्री केली होती असे त्यांनी सांगितले. -

शिवशाहीचे वाहक ए. जे. चौगुले ........................   शिवशाहीची पाठलाग करणे माझ्यासाठी खूप कठीण होते. कारण सकाळी 9 च्या दरम्यान पुणे- नाशिक या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांंची गर्दी असते मी रस्त्यावर कसरत करुण गाडीचा पाठलाग केला. जीव धोक्यात घातला परंतु, शिवशाहीला मोठ्या अपघातातुन वाचविल्याचे मला समाधान आहे -आलोक जंगम.

टॅग्स :OzarओझरShivshahiशिवशाहीAccidentअपघात