शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

पेशवे उद्यानातील शिवसृष्टी निधीअभावी अपूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 13:23 IST

फुलराणीच्या टेकडीवर उभारण्यात येत असलेल्या ‘शिवसृष्टी’चे कामही दोन वर्षांपासून अपूर्ण पडले असून, येथे साकारलेल्या समूह शिल्पांची दुरवस्था होऊ लागली आहे... 

ठळक मुद्देखेळण्यांची दुरवस्था  : केवळ नावालाच उरले ऊर्जा उद्यान; उपकरणेही पडली बंदसाधारणपणे २0१६ साली सुरू झालेले हे काम एक वर्षानंतर पडले बंद शिवसृष्टीची बारा समूहशिल्पे ऊन-वारा-पावसात खराब होऊ लागलीफुलराणी दिवाळीपूर्वी होणार का सुरू?

लक्ष्मण मोरे - पुणे : सारसबागेजवळील पेशवे पार्क हे केवळ नावालाच ऊर्जा उद्यान उरले असून, उद्यानातील अपारंपरिक ऊर्जा उपकरणे बंद पडली आहेत. फुलराणीच्या टेकडीवर उभारण्यात येत असलेल्या ‘शिवसृष्टी’चे कामही दोन वर्षांपासून अपूर्ण पडले असून, येथे साकारलेल्या समूह शिल्पांची दुरवस्था होऊ लागली आहे. महापालिकेच्या वतीने पेशवे उद्यानामध्ये तत्कालीन नगरसेवक अशोक हरणावळ यांच्या निधीमधून  ‘शिवसृष्टी’ उभारण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यासाठी सल्लागाराची नेमणूकही करण्यात आली. साधारणपणे २0१६ साली सुरू झालेले हे काम एक वर्षानंतर बंद पडले. दरम्यान, महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुका झाल्या. या निवडणुकांनंतर आलेल्या सत्ताधारी भाजपचे याकडे दुर्लक्ष झाले. निधीअभावी दोन वर्षांपासून हा प्रकल्प अर्धवट पडला आहे. या ठिकाणी दगड, माती आणि खडीचे ढिगारे तसेच पडलेले असून, शिवसृष्टीची बारा समूहशिल्पे ऊन-वारा-पावसात खराब होऊ लागली आहेत. शिवरायांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग दर्शविणारी ही शिल्पे आहेत. पालिकेने त्यासाठी दीड कोटी रुपयांची तत्कालीन अंदाजपत्रकात तरतूद केली होती. यासोबतच या ठिकाणी मोठमोठे खड्डे खोदून ठेवण्यात आले असून, हे खड्डे लहान मुलांसाठी तसेच मोठ्यांसाठीही धोकादायक आहेत. फुलराणी पाहण्यासाठी येणाºयांना या खड्ड्यांचा अंदाज येत नाही. कोट्यवधींचा खर्च करून झाल्यावर केवळ निधी नसल्याचे कारण देत शिवसृष्टीचे काम अपूर्ण ठेवण्यात आले आहे. ........फुलराणी दिवाळीपूर्वी होणार का सुरू?उद्यानात येणाऱ्या बच्चे कंपनीसह मोठ्यांनाही आकर्षित करणारी ‘फुलराणी’ गेल्या दीड-दोन महिन्यांपासून बंद पडली आहे. देखभाल दुरुस्तीवरून निर्माण झालेल्या अडचणीमुळे फुलराणी बंद ठेवण्यात आल्याचे उद्यान विभागाकडून सांगण्यात आले. पालिकेच्या व्हेईकल डेपोने याविषयी तत्परता दाखवत कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे. नुकताच गणेशोत्सव संपला आहे. शाळेच्या सहामाही परीक्षा संपल्यानंतर शाळांना दिवाळीच्या लांबलचक सुट्या लागतात. त्यामुळे दिवाळीपूर्वी तरी फुलराणी रुळावर यावी, अशी अपेक्षा आहे..........ऊर्जा उद्यान केवळ नावालाचमहापालिका तसेच महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने पेशवे ऊर्जा उद्यान उभारले होते. या उद्यानाचे उद्घाटन २00५ साली तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते केले होते. या उद्यानामध्ये विविध वैज्ञानिक खेळणी बसविली होती. तसेच साहसी खेळ खेळण्यासाठीची खेळणीही बसविलेली होती. काही खेळण्यांमधून ऊर्जा निर्माण होऊन त्याचा वापरही केला जात होता. परंतु, यातील बरीचशी ऊर्जा खेळणी नादुरुस्त आहेत.............फुलराणीच्या टेकडीवर पायथागोरसचे प्रमेय, दृष्टीची चकती, न्यूटनचा तिसरा नियम, घर्षण आणि गती, म्यूजिकल ट्यूब, न्यूटनची रंगीत चकती, कोनात्मक गती, बार्टनचा लोलक, तरंगता पक्षी, गुरुत्व चेंडू अशी वेगवेगळ्या प्रकारची वैज्ञानिक खेळणी आणि त्यामागील विज्ञानाची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली होती. परंतु, ही सर्व खेळणी बंद पडली असून, या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाBJPभाजपाMukta Tilakमुक्ता टिळक