शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

माहिती अधिकार कायद्याच्या वापरामुळे नव्हे तर पैशाच्या वादातून विनायक शिरसाट यांचा खुन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2019 12:56 IST

माहिती अधिकाराखाली त्यांनी बेकायदेशीर बांधकामाविरोधात आवाज उठविल्यामुळे विनायक शिरसाट यांची हत्या झाल्याचा आरोप केला जात होता़.

ठळक मुद्देमुख्य सुत्रधाराला अटक : पोलिसांनी केलेल्या तपासात गुन्हा उघड

पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ता विनायक शिरसाट यांचा माहिती अधिकार कायद्याच्या वापरामुळे नव्हे तर पैशाच्या देवाण घेवाणीवरुन झाल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात उघड झाले आहे़. शिरसाट यांचा खुन करणाऱ्या मुख्य सुत्रधाराला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यामागील कारण स्पष्ट झाले आहे़. धरमप्रकाश कतार्राम वर्मा (वय ३८, रा़ रिव्हरव्हयु सोसायटी, शिवणे) असे या मुख्य सुत्रधाराचे नाव आहे़. वर्मा याचा पी ओ पी चा व्यवसाय आहे़. पी ओ पी मालाच्या पैशाचे देवाण घेवाणी वरुन वर्मा याने विनायक शिरसाट यांच्याशी वाद होऊन भांडणे झाले होते़. त्यावेळी शिरसाट याने वर्मा याला शिवीगाळ केल्याचा राग होता़. त्यामुळे धरमप्रकाश वर्मा याने मुक्तारअली व फारुख खान यांच्याशी संगनमत करुन ३० जानेवारीला विनायक शिरसाट यांना कारमधून घेऊन जाऊन हाताने मारहाण व शस्त्राने वार करुन ठार मारले व त्याचा मृतदेह मुठा गावाच्या जवळ असलेल्या घाटात टाकून दिला होता़.माहिती अधिकाराखाली त्यांनी बेकायदेशीर बांधकामाविरोधात आवाज उठविल्यामुळे विनायक शिरसाट यांची हत्या झाल्याचा आरोप केला जात होता़. त्यांच्या वडिलांनी अनेक बांधकाम व्यवसायिकांची नावे संशयित म्हणून पोलिसांकडे दिली होती़ त्यामुळे सुरुवातीला पोलिसांचा संशय त्यावरच केंद्रित झाला होता़. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे युनिट ३ करीत असताना दोन संशयित तेलंगणा राज्यातील मेहबुबाबाद येथै असल्याची माहिती सहायक पोलीस फौजदार किशोर शिंदे व हवालदार मेहबुब मोकशी यांना मिळाली़. त्यानुसार मेहबुबाबाद येथे जाऊन मुक्तारअली मसीहुद्दीन अली (वय ३४, रा़ लिपाणे वस्ती, आंबेगाव) आणि महंमद फारुख इसहाक खान (वय २८, रा़ उत्तमनगर) यांना ताब्यात घेतले़ त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत वर्मा यानेच त्यांचा खुन केल्याचे स्पष्ट झाले होते़. वर्माला पकडल्यानंतर त्याने खुनाची कबुली दिली़ प्रभारी अपर पोलीस आयुक्त ज्योतीप्रियासिंह, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक निकम, सहायक निरीक्षक संदीप देशमाने, उपनिरीक्षक अजय म्हेत्रे, संजय गायकवाड, सहायक फौजदार किशोर शिंदे, अनिल शिंदे, दत्तात्रय गरुड, दीपक मते, हवालदार मेहबुब मोकाशी, प्रविण तापकीर, रामदास गोणते, संतोष क्षीरसागर, शकील शेख, मच्छिंद्र वाळके, गजानन गानबोटे, रोहिदास लवांडे, विल्सन डिसोझा, संदीप राठोड, अतुल साठे, सचिन गायकवाड, सुजित पवार, कैलास साळुंखे यांनी ही कामगिरी केली़ 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीMurderखूनPoliceपोलिस