शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

साहेबांच्या बारामतीत दुष्काळाची दाहकता वाढती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 01:52 IST

दुष्काळाची झळ वाढतीच : २६ हजार ३१२ ग्रामस्थांना १० टँकरद्वारे पाणीपुरवठा

बारामती : बारामती तालुक्याला दुष्काळाची सर्वाधिक झळ बसत आहे. सध्या तालुक्यातील ग्रामस्थ अवर्षणग्रस्त स्थितीमुळे हिवाळ्यातच तीव्र उन्हाळ्याचा अनुभव घेत आहेत. या वर्षी बारामती तालुक्यात सरासरीच्या केवळ ५१ टक्केच पाऊस झाला. तहसील कार्यालयाकडे या वर्षी केवळ २२१ मिमी पावसाची नोंद आहे. तालुक्यातील तहानलेल्या २६ हजार ३१२ ग्रामस्थांना सध्या टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सध्या तालुक्यातील १४ गावे १०३ वाड्यावस्त्यांना हा पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यात तरडोली, देऊळगाव रसाळ, मोराळवाडी, मुर्टी, सोनवडी, सुपे, कुतवळवाडी, बोरकरवाडी, काºहाटी, पानसरेवाडी, काळखैरेवाडी, बाबुर्डी, गाडीखेल,वढाणे या गावांसह १०३ वाड्यावस्त्यांना १० टँकरने पाणीपुरवठा सुुरु आहे. पिण्याचे पाणीपुरवठा करण्यासाठी दररोज १० टँकरच्या ४८ खेपा सुरु आहेत. ६ शासकीय,४ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आहे.

तालुक्यातील १४ गावांमधील ७ हजार २४५ लोकसंख्येला तर १७ हजार १२६ लोकसंख्येचा समावेश आहे. गेल्या ६ वर्षांपासून बारामती तालुक्यात पावसाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे सोमेश्वर कारखाना, माळेगाव कारखाना, श्री छत्रपती कारखाना परिसरात ऊसशेती नीरा डावा कालव्याच्या पाण्यामुळे सध्या तरी जगली आहे. मात्र, जिरायती भाग पूर्णत: उद्ध्वस्त झाला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचे टँकर या भागांत सुरु आहेत. त्यातील तरडोली, देऊळगाव रसाळ या गावांना मे महिन्यापासून, मोराळवाडी गावाला जून महिन्यापासून टँकर सुरू आहे.पिण्याच्या पाण्यापाठोपाठ जनावरांच्या चाऱ्याचा, पिण्याच्या पाण्याचादेखील गंभीर प्रश्न आहे. चारा, पाणीटंचाईने शेतकºयांच्या दारातील जनावरांची दावण रिकामी होत आहे. उसाच्या ५० मोळ्या ३५०० रुपये दराने विक्री सुरू आहे. पाचट, वाढ्यासह हा उसाचा दर आहे.४प्रत्यक्षात ३५०० रुपयांमध्ये शेतकºयांना ७०० ते ८०० किलो ऊस मिळत आहे. ऊसविक्री करणाºया व्यावसायिकांनी ऊसविक्रीचा व्यवसाय थाटला आहे. हे व्यावसायिक यवत, केडगाव, भांडगाव, नाझरे भागातून ऊस आणुन विक्री करण्यात येत आहे. कारखान्याच्या गाळपासाठी असलेला ऊस जनावरांच्या चाºयासाठी जात असल्याने गळीत हंगामावर त्याचा परीणाम होणार आहे.जनावरांसाठी मका पिकाची उपलब्धता नसल्याने दूध उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. मका पिकाऐवजी उसाचा खाद्यात समावेश झाल्याने हा परिणाम झाला आहे. माझ्याकडे तीन गायींचे प्रतिदिन ३२ लिटर दूध उत्पादन होते. तेच उत्पादन प्रतिदिन १० लीटरने घटले असल्याचे बारामती तालुक्यातील फोंडवाडा येथील शेतकरी विजय वाबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :droughtदुष्काळBaramatiबारामतीPuneपुणे