शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

‘उत्पादनशुल्क’मुळेच बोकाळले दारूधंदे

By admin | Updated: July 17, 2015 03:46 IST

शहर असो वा जिल्हा बेकायदा गावठी दारु, हातभट्टी आणि विनापरवाना विकल्या जाणा-या ताडीचे गुत्ते राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिका-यांच्या आशिर्वादाने बोकाळत चालले आहेत.

पिंपरी : शहर असो वा जिल्हा बेकायदा गावठी दारु, हातभट्टी आणि विनापरवाना विकल्या जाणा-या ताडीचे गुत्ते राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिका-यांच्या आशिर्वादाने बोकाळत चालले आहेत. पुणे विभागामधून वर्षाला तब्बल ६ कोटींची बेकायदा दारु जप्त केली जाते. मुंबईमधील मालवणीमध्ये झालेल्या दारुकांडानंतरही उत्पादन शुल्क विभागाला जाग आलेली नसून विभागात बेकायदेशीर धंदे तेजीत सुरु आहेत. याबाबतची ‘वर्दी’ मिळाल्यानंतरही उत्पादन शुल्क विभागाकडून मात्र कारवाईत हात आखडते घेतले जातात.गेल्याच वर्षी पिंपरीमधील भाटनगर भागात बेकायदेशीर दारुच्या भट्टीवर कारवाई करण्यासाठी गेले असताना दारु पेटवून देण्यात आली. या घटनेत उत्पादन शुल्क विभागाचे दोन अधिकारीही गंभीरपणे भाजले होते. पुण्यातल्या झोपडपट्ट्यांसह ग्रामीण भागात बेकायदा दारु विक्री सुरु असतानाही उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई करण्यात येत नाही. शहरालगतच्या तसेच ग्रामीण भागातील, महामार्गांवरील ढाब्यांवर, काही हॉटेल्समध्ये विदेशी मद्याच्या नावाने बनावट मद्याची विक्री केली जाते. संबंधित कंपन्यांची अशी बनावट दारु तपासण्याची स्वतंत्र व्यवस्था असल्याचे कारण देत उत्पादन विभागाचे अधिकारी मात्र स्वत:ची जबाबदारी झटकत असल्याचे चित्र आहे. उत्पादन शुल्क विभागाचा पुणे विभाग हा शासनाचा महत्वाचा घटक आहे. दरवर्षाला साधारणपणे चौदाशे कोटींचा महसूल या विभागामधून शासनाच्या तिजोरीमध्ये जमा केला जातो. गेल्या तीन महिन्यात २९० कोटींचा महसूल शासनाच्या तिजोरीमध्ये जमा करण्यात आला आहे. परंतु जमा होणा-या महसूलापेक्षा कारवाईच्या नावाखाली हप्ते वसूली करण्याकडे अधिका-यांचा भर असल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षात उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या ३ हजार कारवाईमध्ये १५५४ आरोपींना अटक केली होती. तर ६ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. तर गेल्या तीन महिन्यात दिड कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात येतात. आतापर्यंत नमुन्यांमध्ये विषारी, भेसळयुक्त घटक आढळून आले नसल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका-यांचे म्हणने आहे. धंदे वाल्यांवर धाक जमवण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने मागणी करुन अगदी पोलिसांसारखा दिसणारा खाकी गणवेश शासनाकडून काही वर्षांपुर्वी मंजूर करुन घेतला. बेकायदा धंदेवाले आणि मद्य विक्रेत्यांची उत्पादन शुल्क विभागातील अधिका-यांसोबत असलेली ‘लिंक ’ बेकायदा धंद्यांना अभय देणारी ठरत आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या कारभाराकडे कोणाचेही लक्ष नसल्यामुळे काही अधिका-यांचे फावले आहे. मद्य पिण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या विहीत वयानंतरच परवानगी आहे. त्यासाठी वाईन शॉप, बीअर बार आणि परमीट रुममध्ये दारु पिण्याचे परमीट मिळते. परंतु जवळपास सर्वच मद्य दुकानांमध्ये परमिट न देताच मद्य विक्री सुरु असते. केवळ पाच रुपयांना असलेल्या परमीटचा ठराविक कोटा पुरा करुन दिला की उत्पादन शुल्क विभागाचीही जबाबदारी संपते. त्यामुळे मद्य दुकानदार स्वत:च परमीट दिल्याच्या पावत्या फाडून त्याची रक्कम उत्पादन शुल्क विभागाकडे भरुन टाकतात. केवळ परमीट शुल्कामधून महसूल मिळतो म्हणून हा महसूल मिळवण्याच्या पद्धतीकडे मात्र साफ दुर्लक्ष करण्यात येते. (प्रतिनिधी)