शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

भुशी धरणाच्या जलाशयात बुडून युवा पर्यटकाचा मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 16:29 IST

भुशी धरणात पर्यटक बुडण्याची या आठवड्यातील ही दुसरी घटना आहे.

ठळक मुद्देलोणावळा येथील भुशी धरणात गुरुवारी दुपारी मित्रांसोबत वर्षाविहाराकरिता आलेल्या अंबरनाथ, ठाणे येथील एक पर्यटक भुशी धरणाच्या जलाशयात बुडून मृत्यु झाल्याची दुदैवी घटना घडली आहे.

लोणावळा : लोणावळा येथील भुशी धरणात गुरुवारी दुपारी मित्रांसोबत वर्षाविहाराकरिता आलेल्या अंबरनाथ, ठाणे येथील एक पर्यटक भुशी धरणाच्या जलाशयात बुडून मृत्यु झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. भुशी धरणात पर्यटक बुडण्याची या आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. स्थानिक जीवरक्षक, शिवदुर्ग मित्र, लोणावळा शहर पोलीस व अपघातग्रस्तांच्या मदतीला या पथकाने शोध मोहीम राबवली. आज शुक्रवारी (दि. २२जून) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सदरचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. सुरेंद्र तुकाराम कदम (वय २४, रा.अंबरनाथ, ठाणे) असे या मयत पर्यटकाचे नाव आहे.   लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेंद्र आणि इतर तीन मित्र लोणावळा खंडाळा येथे गुरुवारी वर्षाविहार व पर्यटनासाठी आला होते. ते सर्वजण गुरुवारी दुपारी चारच्या दरम्यान भुशीडॅम येथे फिरायला गेले होते. यावेळी ते धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले असताना पोहताना सुरेंद्र हा मित्रांना बराच वेळ दिसला नाही म्हणून मित्रांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, तो कोठेही आढळून न आल्याने मदतीसाठी आरडा ओरड केली असता भुशीडॅमजवळ असलेले व्यावसायिक व जीवरक्षक साहेबराव चव्हाण, राजू पवार यांनी घटनास्थळी धाव घेत पाण्यात उडी मारून सुरेंद्रचा शोध घेतला. परंतु, तो नक्की कोठे बुडाला याचा अंदाज नसल्याने शोध घेणे अवघड गेले.   तत्पूर्वी, स्थानिकांनी या घटनेबाबत लोणावळा शहर पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तसेच शिवदुर्ग मित्र या जीवरक्षक पथकाचे राजेश तेले, आनंद गावडे, सागर कुंभार, अजय शेलार, प्रणय अंभोरे, प्रविण देशमुख, वैष्णवी भांगरे, अभिजीत बोरकर, राहुल देशमुख, विकास मावकर, अनिल आंद्रे, राजु पाटील, अनिकेत आंबेकर, दिनेश पवार,अतुल लाड, मधूर मुंगसे, प्रविण ढोकळे, अशोक उंबरे,अमोल परचंड, सागर पडवळ, निकीत तेलंगे,रोहीत वर्तक, सुनिल गायकवाड यांनी शोधमोहिमेत सहभाग घेतला. मात्र, अंधार पडल्याने शोध मोहिम थांबविण्यात आली. आज सकाळपासून पुन्हा स्थानिक व शिवदुर्गचे कार्यकर्ते तसेच खोपोलीतील अपघातग्रस्तांच्या मदतीला या पथकाचे कार्यकर्ते यांनी धरणात शोध मोहिम राबवत सुरेंद्र याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :lonavalaलोणावळाDamधरणDeathमृत्यूPoliceपोलिस