शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना’मुळे आयटीवाल्यांचे घरून काम  ; परदेशगमनावर आली बंधने

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 22:30 IST

हिंजवडी, वडगावशेरी, एरंडवणे, कल्याणीनगर या भागांत अनेक नामांकित आयटी कंपन्या

ठळक मुद्देयुरोप-अमेरिकेतील अनेक देशांनी आशियाई देशातल्या व्यक्तींना व्हिसा देण्याच्या धोरणात बदल

पुणे : कोरोना विषाणूचा जगभरात प्रादुर्भाव झाल्याचा परिणाम माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रावर दिसून येत आहे. आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या परदेशवारीवर मर्यादा आणली असून, सुरक्षेचा उपाय म्हणून घरून काम करण्याचा पर्यायदेखील दिला आहे. ‘आयटी’ची राज्याची राजधानी म्हणून पुण्याकडे पाहिले जाते. देशातील आयटीचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणूनही पुण्याचा लौकिक आहे. हिंजवडी, वडगावशेरी, एरंडवणे, कल्याणीनगर या भागांत अनेक नामांकित आयटी कंपन्यांची कार्यालये आहेत. आयटी कंपन्यांमधील कर्मचारी कामासाठी जगभर प्रवास करीत असतात.कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर कर्मचाऱ्यांच्या परदेशवारीवर निर्बंध आले आहेत. युरोप-अमेरिकेतील अनेक देशांनी आशियाई देशातल्या व्यक्तींना व्हिसा देण्याच्या धोरणात बदल केला आहे. नियोजित परिषदा, बैठकाही रद्द करण्यात आल्या आहेत. यांसारख्या कारणांमुळे पुण्यातल्या आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या परदेशगमनावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. पुण्यातल्या कंपन्यांमध्येही कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्गापासून घ्यावयाची दक्षता, स्वच्छतेचे उपाय याची माहिती देण्यात येत आहे. काय करावे आणि काय करू नये, याच्या सूचना प्रत्येकाला ई-मेल तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. कंपन्यांमधले सामूहिक कार्यक्रम रद्द करण्यात आले असून, घरून काम करण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांना दिला आहे. याबाबत सॉफ्टवेअर एक्स्पोर्टर असोसिएशनच्या पुणे शाखेचे उपाध्यक्ष विद्याधर पुरंदरे म्हणाले, ‘‘आमच्यासाठी कर्मचाऱ्यांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रत्येकाला कोरोना संसर्गापासून दूर राहण्यासाठी काय करावे याबाबतची माहिती देण्यात आली आहे. कंपन्यांमध्ये स्वच्छतेबाबत अधिक दक्षता घेतली जात आहे.’’ ............................पर्याय हातात ठेवावा लागेल : प्रदीप भार्गव‘‘कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे देशातील इलेक्ट्रॉनिक, आॅटोमोबाईल आणि रसायन उद्योग काहीसा प्रभावित झाला आहे. मात्र कोणत्याही कंपनीतले काम कच्च्या मालाअभावी ठप्प झालेले नाही. या साथीमुळे कोणत्याही एका देशावर अथवा पुरवठादारावर अवलंबून न राहण्याचा धडा मिळाला आहे. चीनमधे वुहान सोडल्यास इतर ठिकाणच्या कारखान्यातील उत्पादन सुरू झाले आहे. तसेच, तेथून काही जहाजे रवानादेखील झाली आहेत. दोन ते तीन आठवड्यांत माल येईल. इलेक्ट्रॉनिक, रसायने यातून विषाणूचा प्रसार होत नसल्याने तसा धोका नाही,’’ असे मराठा चेंबर आॅफ कॉमर्स इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरचे अध्यक्ष प्रदीप भार्गव यांनी सांगितले. 000

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोनाITमाहिती तंत्रज्ञानHealthआरोग्यEmployeeकर्मचारी