शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

हवामानातील बदलामुळे पुण्यात ‘स्वाईन फ्लू’चे रुग्ण वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 15:35 IST

सध्या शहरामध्ये दुपारी कडाक्याचे ऊन आणि सकाळी व रात्री कडाक्याची थंडी असे वातावरण आहे. वातावरणात झालेल्या या बदलामुळे बहुतांश नागरिकांना ताप, थंडी, सर्दी, खोकला, खसखस, डोकेदुखी अशा आजारांनी घेरले आहे.

पुणे : गेल्या आठ-दहा दिवसांपासून हवामानामध्ये प्रचंड वेगाने बदल होत असून, सकाळ, संध्याकाळ थंडी व दुपारी कडक ऊन या वातावरणामुळे शहरामध्ये साथीच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. हे वातावरण स्वाईन फ्लूसाठी देखील पोषक असल्याने या रुग्णांमध्ये देखील वाढ होत आहे. यामुळे नागरिकांनी खबरदारी घेऊन सर्दी-ताप असल्यास वेळीच उपचार घेण्याचा सल्ला महापालिकेच्या आरोग विभागातील अधिकारी यांनी दिला आहे.सध्या शहरामध्ये दुपारी कडाक्याचे ऊन आणि सकाळी व रात्री कडाक्याची थंडी असे वातावरण आहे. वातावरणात झालेल्या या बदलामुळे बहुतांश नागरिकांना ताप, थंडी, सर्दी, खोकला, खसखस, डोकेदुखी अशा आजारांनी घेरले आहे. साथीच्या आजारांना हे वातावरण पूरक असल्याने नागरिकांमध्ये संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव जलद गतीने होण्याचा धोका वाढला आहे. शहरामध्ये गेल्या दीड महिन्यात १ लाख १५ हजार १७८ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी सुमारे १ हजार ९१० संक्षित रुग्णांना टॅमिफ्लूच्या गोळ््या देण्यात आल्या. तर २०९ रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी लॅबमध्ये पाठविण्यात आले. या तपासणीमध्ये ३ रुग्ण पॉझिटीव्ह अढळून आले असून, एक रुग्ण व्हेटीलेटरवर असल्याचे महापालिकेच्या आकडेवारी वरून स्पष्ट झाले आहे.    शहरातील महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये, प्रसूतीगृहांमध्ये दररोजर दररोज दोन ते तीन हजार रुग्णांचे स्क्रीनिंग सुरु असते. यापैकी खूप कमी रुग्ण स्वाईन फ्लूचे संशयित रुग्ण असल्याचे आढळून येते. परंतु गेल्या काही दिवसांत यामध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यात सध्याचे हवामानातील बदल लक्षात घेता रुग्णांची ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातीलि तज्ज्ञ व्यक्तींने दिला आहे.

टॅग्स :PuneपुणेSwine Flueस्वाईन फ्लू