शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
2
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
3
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
4
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
5
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
6
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
7
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
8
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
9
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
10
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
11
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
12
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
13
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
14
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
15
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
16
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
17
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
18
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
19
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
20
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

खराब रस्त्यांमुळे दौंडचा विकास खुंटला

By admin | Updated: June 6, 2015 22:10 IST

दौंड तालुक्यामधील रस्त्यांची सध्या अत्यंत बिकट अवस्था होत चालली आहे. रस्त्यांच्या कामासाठी राज्य शासनाच्या तिजोरीमधून कोट्यवधीचा निधी टाकला जात असतो

खोर : दौंड तालुक्यामधील रस्त्यांची सध्या अत्यंत बिकट अवस्था होत चालली आहे. रस्त्यांच्या कामासाठी राज्य शासनाच्या तिजोरीमधून कोट्यवधीचा निधी टाकला जात असतो; मात्र एवढा सगळा निधी कोठे जातो, हेच कळायला मार्ग उरला नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून तालुक्यामधील रस्त्यांची कामे, गाव वस्त्यांवरील अंतर्गत रस्त्यांची कामे करण्यात येतात़ मात्र, डांबरीकरणानंतर महिन्याच्या आतच कित्येक रस्ते उखडले जातात. काही ठिकाणी रस्त्याच्या कामासाठी मुरुमाऐवजी मातीचा वापर केल्यामुळे, पावसाळ्याच्या कालावधीमध्ये रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य, डांबरीकरणानंतर पहिल्याच पावसात रस्ता खड्ड्यात अशी अनेक प्रकारची उदाहरणे दौंड तालुक्यामध्ये पाहावयास मिळत आहेत. अनेक ठिकाणी घाटामधील रस्त्यांची कामे अर्धवट स्थितीमध्ये असल्याने प्रवाशांना अपघातांना सामोरे जाण्याची वेळ आलेली आहे. दौंडचा पश्चिम भाग, दक्षिण भागामध्ये जास्त करून दुर्दैवी अशी अवस्था पाहावयास मिळत आहे.दौंड तालुक्यामध्ये पाहिले गेले तर राहु-पारगाव रस्ता, खोर-भांडगाव रस्ता, कासुर्डी-बोरीऐंदी रस्ता, देऊळगाव-पेडगाव रस्ता, राहु-वाघोली रस्ता, पाटस-बारामती रस्ता, सिद्धटेक-दौंड रस्ता, राहु-यवत रस्ता, पाटस-वासुंदे रस्ता, वरवंड-कानगाव रस्ता, वासुंदे-बारामती रस्ता, राहु-दहिटणे रस्ता, राहु-उंडवडी-यवत रस्ता, पारगाव नदीवरील रस्ता अशी कित्येक उदाहरणे रस्त्याच्या उदासिनतेच्या बाबतीत लक्षात येत आहेत. निकृष्ट पद्धतीची कामे होत असल्याने दहा ते पंधरा दिवसांच्या आतच कामे खड्ड्यात जात आहेत. दौंड तालुक्यामध्ये रस्त्यांची दुरवस्था होण्यामध्ये- जवळपास ८0 टक्के रस्ते हे बेकायदेशीर खोदाईमुळे खराब होत आहे. पाइपलाइन टाकण्यासाठी बेकायदेशीररीत्या रस्त्याची खोदाई केली जाते. प्रथम यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घ्यावी लागते. मात्र, शेतकरी अशी कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता- रस्त्यामध्ये जेसीबी-टिकाव यांच्या साहय्याने खोदाई करीत असल्याने रस्ते खराब होत आहेत़ मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग याबाबत निष्क्रिय होत चालल्याचे दिसत आहे. तेवढ्या पुरतीच वरवरची मलमपट्टी करून पुढाऱ्यांची, ग्रामस्थांची नाराजी दूर केली जात असते. नंतर पुन्हा ‘जैसे थे’ अशी अवस्था रस्त्यासंदर्भामध्ये होत चालली आहे़ (वार्ताहर)