शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
2
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
3
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
4
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
5
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
6
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
7
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
8
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
9
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
10
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
11
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
12
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
13
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
14
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
15
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
16
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
17
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
18
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
19
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
20
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?

बारामतीच्या उप कारागृहात क्षमतेपेक्षा दुप्पट कैदी; कोरोना संसर्ग टाळण्यासाठी दक्षता घेण्याबाबत प्रशासन हतबल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2020 20:32 IST

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी दक्षता घेण्याबाबत प्रशासन हतबल

ठळक मुद्देबारामतीच्या उप कारागृहात अनेक गैरसोयी

अमोल यादवबारामती : बारामती शहरातील गुन्हेगारांना ठेवण्यासाठीच्या उप कारागृहाची व्यवस्था व जागा ही अस्वच्छ आहे. त्यामुळे येथील प्रशासनाचा  ढिसाळ कारभार अधोरेखित झाला आहे. बारामती शहर पोलीस स्टेशनच्या आवारात असणाऱ्या उप कारागृहामध्ये सध्या ५० कैदी आहेत .मात्र, या उप कारागृहाची क्षमता २३ कैद्यांची  आहे. सध्याअसलेल्या कोरोना या संसर्गाच्या विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी  येथे कोणतीही उपाययोजना दिसत नाहीत.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर आवश्यक दक्षता घेताना प्रशासनाची हतबलता या निमित्ताने अधोरेखित झाली आहे.कोरोनाने सर्वत्र पाय पसरले असतानाच कैद्यांना वैद्यकीय तपासणीला रुग्णालयात नेण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त मिळत नाही. त्यामुळे कैद्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

पोलीस बंदोबस्ताअभावी कैद्यांच्या जीविताशी खेळले जात असल्याची चर्चा आहे.बारामती शहराची लोकवस्ती वेगाने वाढत आहे बारामती शहरातील गुन्हेगारांना ठेवण्यासाठी असणाºया जेलची मयार्दा २३ कैद्यांची असताना सध्या जेल मध्ये दुप्पटीहुन अधिक  ५० कैदी आहेत. तसेच येथील जेल मध्ये बारामती शहर, बारामती तालुका,वडगाव पोलीस स्टेशन येथील कैदी बारामती मध्ये ठेवलेजातात. तसेच मॅजिस्ट्रेट कस्टडी मधील इंदापुर व दौंड येथील कैदी देखीलदेखील बारामती जेल मध्ये ठेवले जातात. सध्या येरवडा सब जेलचे २१ कैदीत्यांची तारीख असल्याने बारामती येथे आणले आहेत.हे कैदी गेल्या पाचमहिन्यांपासून येथेच आहेत. मात्र ,जेलमधील कैद्यांची संख्या जास्त आहे. येथे गार्डमध्ये सॅनिटायजर ठेवले आहे. कैद्यांना तोंडाला बांधण्यासाठी मास्क दिले असल्याचे कारागृहाचे तुरुंगरक्षक मयुर खोमणे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. नवीन आरोपीला जेलमध्ये टाकण्याआधी त्याची सरकारी दवाखान्यात वैद्यकीय तपासणी केली जाते.तसेच जेल मधील कैद्यांनादेखील इलाजासाठी सरकारी रुग्णालयात आणले जाते. मात्र परत जेलमध्ये घेऊनगेल्यावर त्यांचे निर्जंतुकीकरण केले जात नाही . बराकमध्ये प्रमाणापेक्षा जास्त कैदी असल्याने फिजिकल डिस्टन्स पाळले जात नाही. सध्याच्या कोरोना संसर्गाच्या भीषण परिस्थितीत जर बाहेरून जाणाऱ्या कैद्याची कोरोनाची चाचणी करणे किंवा उपाययोजना करणे गरजेचे आहे.बारामती पोलीस स्टेशनमध्ये एकूण ५ बराक आहेत. पैकी १ महिलांसाठी राखीव तर ४ बराकीत ५० कैदी ठेवण्यात आले आहेत. येथे जागा कमी असल्याने सोशलडिस्टन्सचे पालन होत नाही. केंद्राने जाहीर केलेल्या २७ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केल्यावर २० कैद्यांना जामीन मंजूर झाला आहे,असे  खोमणेयांनी सांगितले.—————————————————————बारामतीच्या उप कारागृहात अनेक गैरसोयी...तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकसंख्येच्या हिशोबाने जागा कमी पडते आहे,पोलीस संख्या कमी असल्याने बंदोबस्त कमी पडतो आहे. जेलसाठी होणाऱ्या साफसफाई साहित्य किंवा इतर वस्तूंसाठी शासनाकडून काही आर्थिक तरतूद नाही,दर आठवड्याला कैद्यांची कटिंग,दाढी करण्यासाठी दोन इलेक्ट्रॉनिक मशीन आणल्या आहेत .याचा वापर सर्व कैदी करतात ,हे देखील सध्या असणाऱ्या कोरोना संसर्गाच्या दृष्टीने घातक आहे. बारामती नगरपालिकेने जेल परिसर व आतील स्वच्छता केली पाहिजे.मात्र स्वच्छता कर्मचारी येत नाहीत,कैद्यांना डेटॉल, अंगोळीचे साबण स्वच्छता हे मी स्वत:च्या खर्चाने करतो, असे तुरुंगरक्षक खोमणे यांनी सांगितले.मे २०१९ ते जानेवारी २०२०पर्यंत लाईटबिल थकीत आहे. ३०२, ३०७, ३७६ सारख्या गुन्ह्यातले आरोपी अटकेत आहेत.रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडीत झाल्यावर इन्व्हर्टरची व्यवस्था नाही अशा अनेक गैरसोयी असल्याचे चित्र आहे.——————————————————————तुरुंगातील गर्दी कमी करायची असल्यास पोलिसांनी देखील फौजदारी प्रकिया संहिता कलम ४१ नुसार आवश्यक असेल अशाच आरोपींना अटक करावी,असे मत बारामती येथील  अ‍ॅड. भार्गव पाटसकर यांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :BaramatiबारामतीPoliceपोलिसjailतुरुंगCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस