शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात डीटीईचे संकेतस्थळ बंद ; विद्यार्थी आणि पालकांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 12:07 IST

तंत्र शिक्षण विभागाचे संकेतस्थळ दुपारी दीड ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत काही तांत्रिक कारणांमुळे बंद पडले.

ठळक मुद्देदहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्वरीतच पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू  सोमवारी शिवाजीनगर येथील तंत्रनिकेतनमध्ये विद्यार्थी व पालकांची मोठ्या संख्येने गर्दी येत्या मंगळवारी प्रवेश अर्ज भरण्याची मुदत संपणार असल्याचे तंत्र शिक्षण विभागाने केले स्पष्ट

पुणे: तंत्र शिक्षण विभागाचे संकेतस्थळ दुपारी दीड ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत काही तांत्रिक कारणांमुळे बंद पडले. मात्र, त्यामुळे दहावीनंतरच्या अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी शिवाजीनगर येथील तंत्रनिकेतनमध्ये (पॉलिटेक्निक ) आलेल्या विद्यार्थी व पालकांना संकेतस्थळ सुरू होण्याची वाट पाहावी लागली. येत्या मंगळवारी प्रवेशाची मुदत संपत असल्याने अभियांत्रिकी पदविका अभ्यसक्रमास प्रवेश मिळणार का? अशी भिती पालक व विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात आली.तंत्र शिक्षण विभागाने पदविका अभ्यासक्रमास अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावेत,यासाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे.त्याचाच एक भाग म्हणून राज्यभर विद्यार्थी व पालकांसाठी समुपदेशनाचे वर्ग घेण्यात आले.दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्वरीतच पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली.मात्र,दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला असला तरी विद्यार्थ्यांना दहावीच्या गुणपत्रिका लवकर प्राप्त झाल्या नाहीत.तसेच अनेक विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला मिळाला नाही. परिणामी विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरून त्यास मंजूरी घेण्यासाठी कमी कालावधी मिळाला. सोमवारी शिवाजीनगर येथील तंत्रनिकेतनमध्ये विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली.मात्र,संकेतस्थळ बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना सुमारे चार ते पाच तास विनाकारण तंत्रनिकेतनमध्ये बसून रहावे लागले.प्रवेशासाठी तंत्रनिकेतनमध्ये आलेले पालक चंद्रकांत हिंगे म्हणाले,विद्यार्थ्यांना दहावीच्या गुणपत्रिका उशीरा मिळाल्या.त्याचप्रमाणे शाळा सोडल्याचा दाखला मिळण्यासही उशीर झाला.त्यातच येत्या मंगळवारी प्रवेश अर्ज भरण्याची मुदत संपणार असल्याचे तंत्र शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.त्यामुळे अनेक विद्यर्थी व पालक तंत्रनिकेतनमध्ये आले होते.परंतु,दुपारी संकेतस्थळ बंद असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज न भरताच परत जावे लागेल.त्यामुळे तंत्र शिक्षण विभागाने प्रवेश अर्ज भरण्यास मुदतवाढ द्यावी.--------------तंत्र शिक्षण विभागाचे संकेतस्थळ काही तांत्रिक कारणामुळे दुपारपासून बंद होते.त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज सादर करता आले नाही.एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये,यासाठी प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ देण्याबाबत वरिष्ठ स्थरावर चर्चा सुरू आहे.प्रवेश अर्ज भरण्यासाठी अवधी मिळणार आहे.त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी घाबरून जाऊ नये. -दिलीप नंदनवार, सहसंचालक तंत्र शिक्षण विभाग,पुणे 

टॅग्स :Puneपुणेonlineऑनलाइनexamपरीक्षाSSC Resultदहावीचा निकालStudentविद्यार्थी