डीएसकेंची अटकपूर्व जामिनासाठी धाव, आज होणार कोर्टात सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 01:37 IST2017-11-04T01:37:36+5:302017-11-04T01:37:48+5:30
बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) आणि त्यांची पत्नी हेमंती यांनी शुक्रवारी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर उद्या शनिवारी सकाळी अकरा वाजता सुनावणी होणार आहे.

डीएसकेंची अटकपूर्व जामिनासाठी धाव, आज होणार कोर्टात सुनावणी
पुणे : बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) आणि त्यांची पत्नी हेमंती यांनी शुक्रवारी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर उद्या शनिवारी सकाळी अकरा वाजता सुनावणी होणार आहे.
गुंतवणुकदारांना आमिष दाखवून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके आणि त्यांच्या पत्नीवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फसवणुकीबरोबरच महाराष्ट्र ठेवीदार हित संरक्षण कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल झाला आहे. या शिवाय संस्थेने विश्वासघात केल्याचा आणि गुन्हेगारी स्वरुपाचा कट रचल्याची कलमे लावली आहेत. जितेंद्र नारायण मुळेकर यांनी फिर्याद दिली आहे. या शिवाय पाचशेहून अधिक तक्रारदारांनी अर्ज केला आहे.