शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

'मोफा' प्रकरणात डीएसकेंना जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 15:40 IST

मुख्य गुन्हयामध्ये दीपक सखाराम कुलकर्णी यांची जामीन याचिका सर्वोच्च न्यायालयात आधीच दाखल

पुणे : फ्लँट खरेदीदारकांकडून आगाऊ रक्कम घेतली पण फ्लँटचा ताबा खरेदीदारांना दिला नाही. यासाठी  महाराष्ट्र ओनरशीप फ्लँटस अँक्ट (मोफा) अंतर्गत 2016 मध्ये दाखल झालेल्या गुन्हयात बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी यांना पुण्यातील न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला.सत्र न्यायाधीश एस.के डुगावकर यांनी हा आदेश दिला.

सिहंगड पोलीस स्टेशननमध्ये 13 आॅगस्ट 2016 रोजी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  डी.एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांनी फ्लँट खरेदीदारकांकडून आगाऊ रक्कम घेतली पण फ्लँटचा ताबा खरेदीदारांना देण्यास ते अपयशी ठरल्याचा आरोप फिर्यादीमध्ये करण्यात आला आहे. या प्रकरणात डीएसके यांना 5 मार्च 2019 रोजी अटक दाखविण्यात आली. मात्र डीएसके यांना ठेवीदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल असलेल्या मुख्य गुन्हयामध्ये न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. त्यानुसार 17 फेब्रुवारी 2018 पासून ते कारागृहात आहेत. या गुन्हयात जामीन मिळण्यासाठी डीएसके यांचे वकील आशुतोष श्रीवास्तव यांच्यासह कनिष्ठ अँड रितेश येवलेकर यांनी अर्ज केला होता.

जामीन प्रकरणामध्ये कुलकर्णी यांच्या बाजूने आशुतोष श्रीवास्तव युक्तिवाद करताना म्हणाले की, डी.एस.कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नीवर जे आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यातील बहुतेक गुन्ह्यांमध्ये त्यांनी अर्धी शिक्षा आधीच भोगली आहे. त्यांना मनमानी नजरकैदेत ठेवण्यात आले आहे, यातून त्यांच्या मूलभूत मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहे.  मानवी हक्कांच्या सार्वभौमिक घोषणापत्राच्या अनुच्छेद 9 आणि भारतीय राज्यघटनेच्या कलम 21मध्ये मुलभूत अधिकार दिलेले आहेत. ’जामीन हा नियम आणि तुरुंग हा अपवाद आहे हे तत्व प्रचलित आहे. मुख्य गुन्हयामध्ये दीपक सखाराम कुलकर्णी यांची जामीन याचिका सर्वोच्च न्यायालयात आधीच दाखल आहे. मात्र ही याचिका प्रलंबित आहे. त्यावर 26 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणे अपेक्षित आहे.

टॅग्स :Courtन्यायालयPoliceपोलिसSocialसामाजिकMONEYपैसा