शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईतही शहरात पाण्याचा ‘सुकाळ’

By admin | Updated: September 4, 2015 02:22 IST

शहरामध्ये अनेक ठिकाणी पाइपलाइनमधून पाणीगळती होत आहे, त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना कळवूनही काहीच दुरुस्ती करण्यात आलेली नाही

पुणे : शहरामध्ये अनेक ठिकाणी पाइपलाइनमधून पाणीगळती होत आहे, त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना कळवूनही काहीच दुरुस्ती करण्यात आलेली नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. महापालिकेने दिलेल्या हेल्पलाइन क्रमांकांवर शहरात पाइपलाइनमधून पाणीगळती होत असल्याचे असंख्य फोन कॉल्स येत आहेत. पाण्याचा गैरवापर केल्यास पुणेकरांवर कारवाईचा बडगा उचलण्याचा इशारा देणाऱ्या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कधी कारवाई होणार असा प्रश्न पुणेकरांकडून विचारला जात आहे.यंदा पाऊस कमी झाल्याने धरणांमध्ये खूपच कमी पाणीसाठा झाला आहे, या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाणी वर्षभर वापरण्याचे आव्हान शहरासमोर उभे ठाकले आहे. पाण्याची आणीबाणी निर्माण झाल्यानंतर झोपेतून जागे झालेले पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी आता कामाला लागले आहेत. येत्या वर्षभरात मोठ्या पाणीकपातीला शहराला सामोरे जावे लागणार आहे.आयडियल कॉलनीतील विजया पांडे यांनी बॉम्बे स्टेशनरीजवळ ४ महिन्यांपासून पाइपलाइनमधून पाणीगळती होत असल्याचे कळविले आहे. कस्तुरबा वसाहतीमध्ये मोटारी बसवून पाण्याचा अनधिकृत वापर सुरू असल्याचे नगरसेवक कैलास गायकवाड यांनी फोन करून कळविले आहे. पर्वती दर्शन येथील साईबाबा मंदिराजवळ दिवसरात्र पाणी वाहत असल्याची तक्रार एका नागरिकाने केली आहे. दत्तवाडी येथील पाण्याच्या टाकीतून सतत पाणी गळती होत असल्याची तक्रार आली आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइन, टाक्या येथून पाणीगळती होत असल्याची माहिती नागरिकांकडून संबंधित क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळोवेळी दिली जाते; मात्र त्याकडे प्रशासनाकडून गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे समोर येत आहे. पाण्याचा गैरवापर होत असल्याचे आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच नळकनेक्शन तोडण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. मात्र दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी करणाऱ्या प्रशासनावर आयुक्त कधी कारवाई करणार, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. गुरुवारी सकाळी भिडे पुलाजवळ पाइपलाइन फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले. पाइपलाइन फुटून अनेक तास उलटले तरी पाणीपुरवठा विभागाचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी त्या ठिकाणी आला नव्हता. शहरामध्ये पाण्याची आणीबाणी निर्माण झाली असताना पाणीपुरवठा विभागाकडून होत असलेल्या या निष्काळजीपणाबद्दल स्थानिक नागरिकांनी तीव्र रोष व्यक्त केला.गळती, गैरवापर दिसला तर लगेच फोन कराशहरामध्ये कुठेही पाण्याचा गैरवापर होत असल्याचे तसेच गळती होत असल्याचे आढळून आल्यास नागरिकांनी खालील क्रमांकांवर महापालिकेस माहिती द्यावी, असे आवाहन आयुक्त कुणाल कुमार यांनी केले आहे.गणेश खिंड रस्त्यावरील खैरेवाडी येथे मेनलाइनमधून पाणी वाहात असल्याची माहिती बोडके यांनी दिली आहे. येरवडा येथील राज चौकामध्ये पाणीगळती होत असल्याचे फिरोज शेख यांनी कळविले आहे. ससून कॉलनीमध्ये पाण्याच्या टाक्यांमधून अनेक वर्षांपासून पाणी गळती होत आहे.