पुणे : पुण्यामध्ये सकाळी पुणे नगर रस्त्यावरच्या शास्त्रीनगर चौकामध्ये एक अत्यंत संतापजनक अशी घटना घडलेली आहे. खरंतर या घटनेला उलटून आता काही तासांचा कालावधी झालेला आहे. तरीसुद्धा अजून FIR च करतायेत. खूप निर्लज्जपणाची हद्द झालेली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही अशी स्थिती आहे. एका तरुणानं मद्यधुंद तरुणानं त्याला भर चौकामध्ये तो लघुशंका करत होता. आणि त्याला ज्यावेळी हटकण्यात आलं त्यावेळी त्याने अश्लील चाळे केल्याचे दिसून आले आहे. पण या सगळ्या घटनेवर आता ठाकरे सेना आक्रमक झालेली आहे. पोलिसांनी आरोपींवर कडक कारवाई केली नाही. तर त्याला आमच्या ताब्यात द्या आम्ही त्याचा हिशोब करू अशी थेट भूमिकाच आता ठाकरे गटाने घेतली आहे. यावेळी ठाकरे गटाचे वसंत मोरे आणि पदाधिकारी उपस्थित होते
आपण सकाळी सकाळी आठ वाजता ही बातमी बघितली. आणि तळपायाची आग मस्तकात गेली. म्हणजे माझं तरी असं झालेलं आहे. खूप चिड आली आहे. जसा राग तुम्ही आता बोलताना व्यक्त केला तसाच राग आमच्या सगळ्याच महिलांचा आहे . हे कोण ते तीन-चार तरुण BMW मधून बसून पार्टी करून सात साडेसातच्या दरम्यान त्या शास्त्री रस्त्याच्या त्याठिकाणी गाडीतनं उतरतात काय? तिथे लघुशंका करतात काय? खरंतर ती लघुशंका त्यांनी केलेली आहे प्रशासनाच्या तोंडावरती आणि जे काही आत्ता पोलिसांचा धाक राहिलेला नाही आहे.गृहमंत्र्यांचा साफ दुर्लक्ष झालेला आहे या सगळ्या गोष्टींकडे खरंतर ती लघुशंका त्यांनी त्यांच्या तोंडावरच केलेली आहे. की आता तरी पोलीस प्रशासनाने सुधरावं त्यांनी लक्ष द्यावं. की अशा पद्धतीने विकृत माणसं रस्त्यावरती फिरतात आणि त्याचा त्रास महिलांना सगळ्यात जास्त होतोय. कारण महिला या रस्त्यावरती पूर्णपणे असुरक्षित आहेत. आणि यांचे अनुभव आम्ही पदोपदी घेतोय असे त्यांनी यावेळी रेखा कोंडे यांनी सांगितले आहे.
वसंत मोरे म्हणाले, याचा मी जाहीर निषेध करतो आणि पुणे शहर हे सुसंस्कृत राहिलेलं नाही आहे. खऱ्या अर्थानं महिला आयोगाच्या काही सदस्या सुद्धा आजही सुरक्षित नाहीयेत. महिला आयोगाचं म्हणतंय की, आता पुण्याचं नाव खराब झालेलं आहे. तर पुण्याचं नाव आता याच्यापेक्षा काय खराब व्हायचं बाकी राहिलंय. तर माझं एक त्यांना जाहीरपणे एक निवेदन आहे. की जर तातडीने सांगितल्याप्रमाणे तो माणसावरची जर कारवाई या चोवीस तासात नाही केली. तर शिवसेना आपल्या स्टाईलने त्याला कारवाई करेल नक्कीच. आता जे दोन मुलं मद्यधुंद अवस्थेमध्ये त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसतायेत. ते तरुण काही पबमधून बार मधून बाहेर आल्याचं सुद्धा प्राथमिक माहिती आहे. असं जर असेल तर नुकतंच या शहरामध्ये घटना घडली. त्यामध्ये दोन जणांना जीव सुद्धा गमवावा लागला. आणि तात्पुरती फक्त मलमपट्टी हे सरकार करतं की काहीतरी नियमावली आम्ही करत आहे. पण खरंच त्या नियमावलीचं पालन होतंय.
त्याची जाताना जी तुम्ही स्पीड बघितला. जो चाकं वाजवत गेलाय म्हणजे तो येताना किती स्पीडने आला असेल. आणि चौकाच्या मधोमध उभा राहिलाय त्याच्या बापाचा चौक असल्यासारखा तो करतो आहे. ते मला वाटतं त्याला त्याचं चौकात आणून हाणला पाहिजे. पोलीस आता करतात ना की गाड्या फोडल्या की त्याला त्या चौकात घेऊन जातात. त्याला गुडघ्यावर चालायला लावतात. याला सुद्धा त्याचं चौकात गुडघ्यावर नेऊन चालायला लावला पाहिजेल. त्यांनी ज्या एक प्रकारे तो पोलीस प्रशासन महानगरपालिका या सगळ्याच्या तोंडावरती त्यांनी लघुशंका केलेल्या आहेत. आणि ते जर ते जर त्यांच्याकडून काही होत नसेल ना तर आम्ही खंबीर आहोत आम्हाला फक्त त्याचा पत्ता कळाला पाहिजे. संध्याकाळपर्यंत त्याचा आम्ही कार्यक्रम करू असा इशारा वसंत मोरे यांनी दिला आहे.