शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

दारूच्या नशेत अल्पवयीन मुलांकडून वाहनांची तोडफोड; पोलिसांनी दारू देणारे बार केले सील

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 13:36 IST

पोलिसांनी अल्पवयीन मुलांना दारू विक्री करणाऱ्या नशा बारवर कारवाई करीत बार सील केले आहे. तसेच, बारमालक, मॅनेजर, बार काउंटर, दारू देणाऱ्यासह त्या अल्पवयीन मुलांच्या पालकांना गुन्ह्यात सहआरोपी केले

धायरी: सिंहगड रस्ता परिसरातील हिंगणे खुर्द येथे दारूच्या नशेत अल्पवयीन मुलांनी वाहनांची तोडफोड करून दहशत माजविल्याच्या प्रकरणात सिंहगड रस्ता पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलांना दारू विक्री करणारे नशा बारवर कारवाई करीत बार सील केले आहे. तसेच, बारमालक, मॅनेजर, बार काउंटर, दारू देणाऱ्यासह त्या अल्पवयीन मुलांच्या पालकांना गुन्ह्यात सहआरोपी केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तीन दिवसांपूर्वी दोन अल्पवयीन मुलांसह त्याच्या साथीदारांनी हिंगणे खुर्द, वडगाव बुद्रुक येथील तुकाईनगरमध्ये ‘आम्हीच या भागातील भाई’ म्हणत गोंधळ घालत २० ते २२ वाहनांची तोडफोड केली होती. तर, एका तरुणावर कोयत्याने हल्ला केला होता. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी अल्पवयीन मुलांना पकडले होते. तर, त्यांचा साथीदार साई पांडुरंग उमाप (१८, रा. समर्थनगर) याला अटक केली होती. पोलिसांनी गुन्ह्याचा सखोल तपास केल्यानंतर चौघे जण दारू प्यायले असल्याचे समोर आले होते. चौकशीत या तिघांनी वडगाव बुद्रुक येथील हॉटेल नशा बारमधून दारू घेतली. त्यानंतर ते दारू प्यायले असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांनी दहशत माजवून वाहनांची तोडफोड केल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी सीसीटीव्ही व इतर माहितीवरून चौकशी केली. नंतर बार मालकांसह मॅनेजर व दारू देणाऱ्यांना या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. पोलिसांनी मॅनेजर, दारू देणारा व बार काउंटर यांना अटक केली, तर बार मालक पसार झाला आहे. पोलिस उपायुक्त संभाजी कदम, सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप दाइंगडे, गुन्हे निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुरेश जायभाय हे तपास करीत आहेत.

बारमालकांचे धाबे दणाणले...

कायद्याने अल्पवयीन मुलांना दारू न देण्याबाबत नियम आहे. अल्पवयीन मुलाला दारू दिली म्हणून पोलिसांनी बारवर कारवाई केल्याने बारचालकांचे धाबे दणाणले असून, या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांमध्ये वाहन तोडफोड, दहशत माजवणे, आर्म ॲक्टनुसार गुन्हा नोंदवत दोन अल्पवयीन मुलांसह एका आरोपीला अटक केली होती. गुन्ह्यात अल्पवयीन मुलाचे वडील धर्मा सरोदे (७५), दुसऱ्या एका मुलाची आई तसेच नशा बारचे मालक/चालक तसेच बार मॅनेजर अनिल विनायक सूर्यवंशी, बार काउंटर विनोद दत्ता कांबळे, दारू विकत घेऊन देणारा कालिदास नायकवाडी यांचा गुन्ह्यात समावेश करण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेDhayariधायरीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक