वाहनाच्या धडकेत बिबट्याची मादी ठार
By Admin | Updated: February 10, 2015 01:21 IST2015-02-10T01:21:24+5:302015-02-10T01:21:24+5:30
पारगावतर्फे आळे येथील औरंगपूर-भागडी रस्त्यावर वाहनाच्या धडकेने बिबट्याची मादी ठार झाली. रविवारी (दि. ८) हा अपघात झाला

वाहनाच्या धडकेत बिबट्याची मादी ठार
बेल्हा : पारगावतर्फे आळे येथील औरंगपूर-भागडी रस्त्यावर वाहनाच्या धडकेने बिबट्याची मादी ठार झाली. रविवारी (दि. ८) हा अपघात झाला. त्यात ती जागेवरच मृत झाली.
ही बिबट्याची मादी बबन नानाभाऊ गुंड यांच्या उसाच्या शेताच्या कडेला मृत पडली होती. ती २ वर्षांची होती. तिच्या डोक्याला जोरदार मार लागला होता. प्रवाशांनी वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना ही माहिती दिली. बेल्हा येथे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील यांनी शवविच्छेदन केले. (वार्ताहर)