शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
4
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
5
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
6
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
7
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
8
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
9
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
10
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
11
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
12
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
13
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
14
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
15
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
16
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
17
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
18
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
19
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
20
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...

ड्रायव्हरला डांबले, 'बाळा'चे आजोबा अटकेत, ४ दिवस पोलिस कोठडी, बापाविरुद्धही गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2024 13:08 IST

चालकाने दिलेल्या फिर्यादीवरून अग्रवाल बाप-लेकावर कलम ३४२, ३६५ व ३६८ अंतर्गत येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : पोर्शे अपघात प्रकरणात अल्पवयीन बाळासोबत असलेल्या ड्रायव्हरला बंगल्यात डांबून ठेवत धमकावून त्याचा मोबाइल काढून घेतला. याप्रकरणी बाळाचे आजोबा सुरेंद्रकुमार ब्रह्मादत्ता अग्रवाल (७७, रा. ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी) याला पुणे पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जे. बर्डे यांनी त्यांना २८मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. याप्रकरणी बाळाचा बाप विशाल अग्रवाल याच्यावरदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चालकाने दिलेल्या फिर्यादीवरून अग्रवाल बाप-लेकावर कलम ३४२, ३६५ व ३६८ अंतर्गत येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मी दिल्लीला होतो...

  • सुरेंद्रकुमारला न्यायालयाने पोलिसांविरोधात काही तक्रार आहे का? असे विचारले. त्याने सांगितले की, अपघात घडला तेव्हा मी पत्नीसोबत दिल्लीत होतो. 
  • सुरेंद्रकुमारवर यापूर्वी खुनाचा प्रयत्न, फसवणूक यासह विविध कमलांनुसार चार गुन्हे दाखल आहेत. 

‘त्या’ मद्यधुंद चालकाची कार होती ‘मिनी बार’

नागपूर : मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे कार चालवून तिघांना गंभीर जखमी करणाऱ्या आरोपी चालकाच्या कारमध्ये दोन दारूच्या बाटल्या, दोन बिअरच्या बाटल्या आणि ३२ ग्रॅम गांजा, प्लास्टिकचे ग्लास आढळल्याने ही कार म्हणजे ‘मिनी बार’च असल्याची माहिती उघड झाली आहे. तिन्ही आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.सनी सुरेंद्र चव्हाण (३७), अंशुल विजय ढाले (२४) आणि आकाश नरेश महेरुलिया (३१, अशी आरोपींची नावे आहेत. सनीने शुक्रवारी रात्री भरधाव वेगात कार दामटून तिघांना गंभीर जखमी केले होते.

‘तू गुन्हा अंगावर घे, आम्ही तुला गिफ्ट देऊ’

पुणे: कल्याणीनगर अपघात प्रकरणात ‘बाळा’ला वाचवण्यासाठी अग्रवाल बाप-लेकाने विविध मार्गांचा  अवलंब केल्याच्या बाबी समोर आल्या. त्यांच्या चुकीच्या कृत्यामुळे तीन पिढ्यांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लागला आहे. सगळ्या अपराधांचे ठोस पुरावे पोलिसांकडे आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.पोर्शे कारखाली दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन बाळाला वाचवण्यासाठी शहरातील धनाढ्य अग्रवाल कुटुंबाकडून शक्य त्या सर्व मार्गांचा अवलंब केला जात आहे. याच अग्रवाल कुटुंबातील विशाल अग्रवाल आणि सुरेंद्रकुमार अग्रवाल या आरोपींनी त्यांच्या चालकावर खोटा जबाब देण्यासाठी दबाव आणल्याची माहिती समोर आली आहे.

ऐकले नाही तेव्हा दिली धमकी : आयुक्त

  • पोलिस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्रवाल कुटुंबीयांनी त्यांच्या चालकाला धमकावले. चालक आपल्या घरी जात असताना सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांनी त्याला आपल्या कारमध्ये बसवून घरी नेले. त्यानंतर आरोपींनी गंगाराम हेरीक्रुब याच्याकडून मोबाइल काढून घेतला आणि त्याला घरातील एका खोलीत डांबून ठेवण्यात आले. 
  • ‘तू कुठेही जायचे नाही, कोणाशीही बोलायचे नाही. आम्ही सांगतो तोच जबाब पोलिसांना द्यायचा’ असा दबाव अग्रवाल बाप-लेकाने चालकावर आणला. ‘तू हा गुन्हा तुझ्या अंगावर घे, आम्ही तुला गिफ्ट देऊ’ असे सांगून अग्रवाल यांनी गंगाराम हेरीक्रुब यांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला. हे सांगूनही तो ऐकायला तयार नव्हता तेव्हा अग्रवाल बाप-बेट्यांनी चालकाला धमकावले. ‘आम्ही तुला बघून घेऊ’, अशी धमकी त्यांनी ड्रायव्हरला दिली हाेती.

मी कार चालवत नव्हतो

अपघात झाला तेव्हा कार मुलगा नव्हे, तर ड्रायव्हरच चालवत होता, असा दावा विशाल अग्रवालने न्यायालयात केला. मात्र, अपघाताच्या वेळी कार मुलगाच चालवत होता, अशी कबुली ड्रायव्हरने दिली असल्याचे पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

तपास गुन्हे शाखेकडे

प्रकरणाचा तपास शुक्रवारी गुन्हे शाखेकडे वर्ग केला. गुन्हे शाखेने  ड्रायव्हरसह अग्रवालच्या घरी जाऊन पंचनामा केला. ड्रायव्हरला ज्या खोलीत डांबले होते. त्याने जे कपडे घातले होते, ते ताब्यात घेतले.  

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघात