शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Pune Police: मद्यपान, मोबाइलवर संभाषण, राँग साईड; शहराच्या मध्यवर्ती भागात झाडाझडती, पोलिसांची ४० जणांविरोधात कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 18:52 IST

पुढील काळात पोलिसांकडून अचानक कारवाई करण्यात येणार असून, संवेदनशील ठिकाणांची तपासणी करण्यात येणार असे पोलिसांनी सांगितले

पुणे: डेक्कन जिमखाना, शिवाजीनगर, तसेच मध्य भागातील विश्रामबाग, खडक, समर्थ, फरासखाना पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी गुरुवारी रात्री झाडाझडती घेतली. या कारवाईत वेगवेगळ्या भागांत तपासणी करण्यात आली. बेकायदा प्रकार करणाऱ्या ४० जणांविरोधात खटले, तसेच गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली.

परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या नेतृत्वाखाली फरासखाना, समर्थ, खडक, विश्रामबाग, डेक्कन आणि शिवाजीनगर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ही मोहीम राबविण्यात आली. मध्य भागातील ४१ संवेदनशील ठिकाणे, मोकळ्या जागा, तसेच सार्वजनिक जागांची तपासणी करण्यात आली. सार्वजनिक मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन, शांतता भंग करणे, तसेच छेडछाड करणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. गुरुवारी रात्री दोन तास ही माेहीम राबविण्यात आली. भारतीय न्याय संहिता कलम २८५ अन्वये दोन गुन्हे दाखल केले. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणे (कोटपा ॲक्ट) अन्वये पाच खटले दाखल करण्यात आले. महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये २२ जणांविरुद्ध कारवाई केली. वाहतूक नियमभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली. ट्रिपल सीट जाणाऱ्या दहा दुचाकीस्वारांविरोधात कारवाई करण्यात आली.

वाहन चालवताना मोबाइलवर संभाषण करणे, तसेच राँग साईडने जाणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधात कारवाई करण्यात आली. पोलिस आयुक्त अमितेशकुमार, पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली खडक, शिवाजीनगर, डेक्कन, विश्रामबाग, फरासखाना, समर्थ पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पथके या कारवाईत सहभागी झाले होते. ‘पुढील काळात पोलिसांकडून अचानक कारवाई करण्यात येणार असून, संवेदनशील ठिकाणांची तपासणी करण्यात येणार आहे,’ असे पोलिस उपायुक्त रावले यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Police Crackdown: Drunk Driving, Wrong Side Driving Targeted

Web Summary : Pune police conducted raids in central areas, booking 40 individuals for offenses including public intoxication, traffic violations, and disturbing the peace. Raids targeted sensitive locations.
टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीSocialसामाजिकbikeबाईकcarकारTrafficवाहतूक कोंडी