कवितांचा रंगला नाटय़मय आविष्कार

By Admin | Updated: November 10, 2014 23:03 IST2014-11-10T23:03:57+5:302014-11-10T23:03:57+5:30

,दीपोत्सव हा आला पहा.. दोनच अक्षरे केवळ तरी विश्व व्यापुनी जाती.. यासारख्या मनाला भावणा:या कवितांचे नाटय़रूपांतर करूऩ लहानग्यांनी उपस्थितांची दाद मिळवली.

Dramatic invention of poems | कवितांचा रंगला नाटय़मय आविष्कार

कवितांचा रंगला नाटय़मय आविष्कार

पुणो : काल काही निराळेच घडले, स्वप्नात माङया बाबा आले.. जुन्या पिढी पुढे नव्या पिढीची अशीच होते शरणागती. ,दीपोत्सव हा आला पहा.. दोनच अक्षरे केवळ तरी विश्व व्यापुनी जाती.. यासारख्या मनाला भावणा:या कवितांचे नाटय़रूपांतर करूऩ लहानग्यांनी उपस्थितांची दाद मिळवली. 
निमित्त होते डॉ. ज्योती रहाळकर लिखित ‘आम्ही मैत्रिणी’ या कविता लिहिल्या होत्या. बालदिनाचे औचित्य साधून ज्ञानप्रबोधिनी प्रशालेतील सातवीतील शर्वरी पाटबडकर, सई कामत, वैष्णवी नातू, अरूजा रहाळकर, ऋता डिके, आकांक्षा पानसरे, अनुष्का जोशी, गायत्री साने, जुई चंद्रचुड या विद्यार्थिनींनी विविध विषयांवर आधारीत कविता अभिनयातून सादर केल्या.  
नेहमी कविता वाचून कवितांचे सादरीकरण केले जाते. परंतु या आगळ्य़ावेगळ्य़ा कार्यक्रमात विद्यार्थिनींनी प्रथमच कवितांमधून अभिनयाची सांगड घातली व प्रेक्षकांची मने जिंकली. धनश्री गणात्र यांनी कार्यक्रमाला संगीत दिले.  
 
सादरीकरण अवघड 
4कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त भाव कवितांच्या माध्यमांतून डोळ्य़ासमोर ठेवता येतात. लहानपणापासूनच जर कविता पाठांतराची आवड मुलांमध्ये बिंबवली तर त्याची गोडी वाढत जाते. कविता वाचन करणो सोपे आहे, परंतु त्या पाठ करून त्यांचे नाटय़मय पद्धतीने सादरीकरण करणो अवघड आहेल, अशा भावना डॉ. रहाळकर यांनी यावेळी व्यक्त केल्या.
सामाजिक विषयांवर भर 
4कधी उघडतील गंजलेल्या या बंद मनाची दारे, कधी घेतील स्त्री गर्भाकुंर श्वास मोकळे. या कवितेतून स्त्री भ्रूण हत्येसारख्या सामाजिक विषयांवर प्रकाश टाकण्यात आला. स्त्री भ्रूण हत्येचे वाढते प्रमाण व त्यावर कसा र्निबध घालता येईल. हे याकवितेतून प्रक्षेकांसमोर मांडण्यात आले.  हृदयाला स्पर्श करतील अशा प्रकारे या कवितेचे सादरीकरण मुलींनी केले.  

 

Web Title: Dramatic invention of poems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.