शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
4
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
5
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
6
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
7
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
8
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
9
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
10
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
11
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
12
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
13
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
14
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
15
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
16
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
17
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
18
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
19
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
20
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू

आता संपूर्ण वर्षभर सुरु राहणार बालनाट्य कार्यशाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2019 10:37 AM

बालनाट्य असो किंवा अभिनय  शिबिर आणि कार्यशाळा यांचा हंगाम असतो तो उन्हाळा किंवा दिवाळीपुरताचं. शाळा सुरू झाल्यावर मुले अभ्यास एके अभ्यासच्याच  कोशात गेल्यानंतर नाटय कलेचा पालक आणि मुलांना पूर्णत: विसर पडल्याचे दिसून येते.

पुणे : बालनाट्य असो किंवा अभिनय  शिबिर आणि कार्यशाळा यांचा हंगाम असतो तो उन्हाळा किंवा दिवाळीपुरताचं. शाळा सुरू झाल्यावर मुले अभ्यास एके अभ्यासच्याच  कोशात गेल्यानंतर नाटय कलेचा पालक आणि मुलांना पूर्णत: विसर पडल्याचे दिसून येते. यावर बालरंगभूमी परिषद पुणे शाखेने एक उत्तम पर्याय शोधला असून, केवळ हंगामापुरत्याच या कार्यशाळा मर्यादित न ठेवता संपूर्ण वर्षभर या कार्यशाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था असलेल्या बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे (मुंबई) अध्यक्ष प्रकाश पारखी आणि परिषदेच्या पुणे जिल्हा शाखेचे अध्यक्ष उदय लागू यांनी सोमवारी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी परिषदेच्या पुणे जिल्हा शाखेचे प्रमुख कार्यवाह दीपक रेगे, कोषाध्यक्ष अरूण पटवर्धन, कार्यकारी सदस्य देवेंद्र भिडे आणि दिपाली शेळके उपस्थित होते.पारखी म्हणाले, आज काही शाळा सोडल्या तर बहुतांश शाळांमध्ये चित्रकला आणि संगीत या व्यतिरिक्त इतर कलांकडे दुर्लक्ष झालेले दिसते. नाटक हा विषय शाळांमध्ये शिकविलाच जात नाही, हे वास्तव आहे. यातच  संगीत आणि नृत्य कलांसाठी शासनमान्य परीक्षा आहेत पण नाट्यकलांसाठी कोणत्याही परीक्षा नाहीत. यासाठी मी दोन वर्षांपूर्वी नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे प्रत्येक वयोगटातील मुलांकरिता ’बालनाट्य संस्कार,  ‘किशोर नाट्यसंस्कार’ आणि कुमार नाट्यसंस्कार असा तीन परीक्षांचा अभ्यासक्रम तयार केला आहे. या अभ्यासक्रमानुसार कार्यशाळा  झाल्यानंतर मुलांच्या परीक्षा घेतल्या जातात. याच अभ्यासक्रमानुसार आता बालरंगभूमी परिषद पुणे जिल्हा शाखेच्या वतीने 7 ते 16 वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी वर्षभर ज्या कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत त्यानंतर दर तीन महिन्यांनी कार्यशाळेत सहभागी विद्याथर््यांचे सादरीकरण होणार असून, वर्षाच्या शेवटी विद्याथर््यांची शंभर महिन्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे.  या परीक्षेमध्ये वाचिक,कायिक अभिनय, कथावाचन, अभिवाचन यांचा समावेश असेल. या परीक्षा नाट्यसंस्कार संस्थेच्या माध्यमातून घेतल्या जातील.शाळांमध्ये  ‘नाटक’ हा विषय समाविष्ट केला जावाशाळांमध्ये  ‘नाटक’ हा विषय समाविष्ट केला जावा यासाठी वर्षभरापूर्वी तीन वर्षांचा हा अभ्यासक्रम शासनाकडे सुपूर्त करण्यात आला आहे. मात्र तो शासनदरबारीच धूळ खात पडून आहे. त्यावर कोणत्याच  प्रकारची हालचाल झाली नसल्याची खंत प्रकाश पारखी यांनी व्यक्त केली.

टॅग्स :cultureसांस्कृतिकPuneपुणे