शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील ससूनचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची तडकाफडकी बदली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 22:09 IST

ससूनमधील कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू रोखण्यात अपयश येत असल्याने ही बदली करण्यात आल्याची चर्चा..

ठळक मुद्देकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ससूनच्या नवीन इमारतीला कोविड रुग्णालयाचा दर्जा उप अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्याकडे पदभार

पुणे : बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची राज्य शासनाने गुरुवारी तडकाफडकी बदली केली आहे. रुग्णालयामध्ये मागील १५ दिवसात ३८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाले आहेत. हे मृत्यू रोखण्यात अपयश येत असल्याने ही बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. दरम्यान, उप अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला आहे.कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ससूनच्या नवीन इमारतीला कोविड रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला. या इमारतीत रुग्णांवर उपचारही सुरू झाले आहेत. त्यापूर्वी जुन्या इमारतीतील २७ व २८ क्रमांकाच्या वॉर्ड मध्ये दि. ३१ मार्च पासून बाधित रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले. त्यानंतर दोन दिवसापासूनच बाधित रुग्णांच्या मृत्यू चे प्रमाण वेगाने वाढत गेले. दररोज किमान एक तरी मृत्यू होत आहे. त्यामुळे १६ दिवसातच हा आकडा ३८ वर पोहचला. देशातील कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यू दरात पुणे आघाडीवर आहे. हेच कारण चंदनवाले यांना भोवल्याची चर्चा आहे. त्यांच्या विषयी काही राजकीय नेत्यांनी शासनाकडे तक्रारी ही केल्या होत्या. त्यांच्या निष्काळजीपणा मुळेच मृत्यू वाढल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच शासनाने मृत्यूचा अभ्यास करण्यासाठी टास्क फोर्स ही स्थापन केले आहे. या पार्श्वभूमीवर चंदनवाले यांची बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. सध्या त्यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या सह संचालक पदाची अतिरिक्त जबाबदारी होती. आता या पदाची पूर्णवेळ जबाबदारी देण्यात आली आहे. तर ससून चा पदभार उप अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. डॉ. यांनी यापूवीर्ही ही जबाबदारी सांभाळली आहे.---------शासन आदेशाचे पालन केले जाईल. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या सह संचालक पदावर बदली झाली आहे. शुक्रवारी डॉ. तांबे यांच्याकडे पदभार सोपविला जाईल.डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, ससून रुग्णालय-----

टॅग्स :Puneपुणेsasoon hospitalससून हॉस्पिटलTransferबदलीState Governmentराज्य सरकारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यू