पुणे: फलटण येथील शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली आणि कथित आराेपी देखील तात्काळ स्वत:ला पाेलिसांच्या स्वाधीन केले. या सर्व घडामाेडी पाहता डाॅ. संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली नसून, त्यांची संस्थात्मक हत्या केली गेली, असे म्हणावे लागेल. याची दखल घेत उच्च न्यायालयानेच समिती स्थापन करून तपास करावा आणि त्यात माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचीही चाैकशी व्हावी, अशी मागणी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.
आत्महत्या प्रकरणातील सुसाइड नोट आणि हातावरील अक्षर यात साम्य नाही, तसेच आरोपी पोलिस स्वतः कसा काय हजर झाला? ऊसतोड कामगारांना बेदम मारहाण करायचे आणि फिजिकली फिट असण्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारी रुग्णालयावर दबाव आणायचे? त्याला नकार देताच डॉ. संपदा मुंडे यांच्यावर दबाव टाकला गेला.
फडणवीस यांच्या ताफ्यात असणारा गुंड याचीही माहिती लवकरच उघड करणार आहे. ऊसतोड कामगारावर राजकारण करणारे नेते देखील याबद्दल काही बोलत नाहीत. कोयतेकरी लोकांच्या सुरक्षेबद्दल काहीच का करत नाहीत. रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांची टीम ऊसतोड कामगारांना उचलून आणत बेदम मारहाण करत. फिजिकली फिट असण्याचे प्रमाणपत्र देण्यास नकार देत असल्याने डॉ. संपदा मुंडे यांच्यावर दबाव टाकला गेला. २०२२ ते आतापर्यंत पोलिसांना हाताशी धरून २७७ तक्रारी रणजीतसिंह निंबाळकर यांनी नोंदवल्या. त्यांना पोलिसांकडून त्रास दिला गेला. कामगारावर तक्रारी नोंदवल्या. याच्या पोलिस एफआयआर नोंदवल्या. बीड येथील आहेत म्हणून त्रास देता का? महाडिक, राहुल धस, बदणे कोण आहे? माणूस बॉयलरमध्ये टाकून मारून टाकता. २०० वर बीपी असताना मी त्या व्यक्तीला तंदुरुस्त असल्याचे पत्र देणार कसे? वैष्णवी हगवणे प्रकरणात देखील असेच केले गेले. चारित्र्य हनन करताना लाज वाटली पाहिजे. हॉटेल मधुदीप येथे रात्री एक वाजता प्रवेश दिले कसे? स्वतःचे घर असताना ती तिथे गेली कशी? हॉटेल मालक भोसले आहे. तो नगरसेवक पदाचा इच्छुक उमेदवार आहे. संपदा मुंडे यांची हत्या केली की आत्महत्या?नंदकुमार ननावरे दांपत्य दोन वर्षांपूर्वी आत्महत्या केली. त्यापूर्वी त्यांनी व्हिडिओ करून निंबाळकर यांच्या नावाचा उल्लेख केला गेला. एक एक बोट तोडून घेतो. यात बालाजी किणीकर यांचे नाव ठेवले गेले आणि निंबाळकर यांना क्लीन चीट दिली. यापूर्वी दोन बहिणींनी देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी एक मुलगी येथे आहे. वर्षा दिगंबर आगवणे... जगदीश कदम याने घरी येऊन धमकी दिली. वडिलांचा कार्यक्रम केला आहे आणि आता तुमचा करू म्हणत होते. आई वडिलांवर गुन्हा नोंदवल्यानंतर आमच्यावर अतिप्रसंग घडण्याची भीती होती. त्यामुळे आम्ही आत्महत्येचा प्रयत्न केला. निंबाळकर यांच्या सोबत दिगंबर आगवणे यांची भागीदारी होती. त्यातून पुढे २४ गुन्हे त्यांच्यावर दाखल केले गेले. मकोका गुन्हा नोंदवले. जयश्री दिगंबर आगवणे म्हणाल्या की, आज डॉ. संपदा मुंडे हिच्यावर जी वेळ आली. तीच स्थिती मागील काही वर्षांपासून आमच्यावर आहे. सत्तेचा गैरफायदा करत २५ गुन्हे दाखल केले. त्यातील १२ गुन्हे माझ्यावर आहेत. आमच्या प्रकरणाची माध्यमांतून देखील नोंद करून दिली नाही. ईडीची नोटीस दिली गेली.
अंधारे म्हणाल्या की, निंबाळकर यांच्या सांगण्यावरून हे सर्व सुरू आहे. पडेल खासदार हे सर्व कस काय करू शकतो. भाऊबीज पूर्वी तीन दिवस बहिणीशी बोलून गावी येणार असल्याचे सांगते. हॉटेलवर ती कशी पोहोचली. डेड बॉडी उचलण्याची घाई का केली? बदने, बनकर कुटुंबाची मुलाखत कशी दाखवली जाते. सुसाइड नोट गायब झाली आहे का? दिशाभूल केली जात आहे का?निंबाळकर चौकशीच्या फेऱ्यात आलेच पाहिजेत. निंबाळकर यांचे दोन पीए, डॉ. अंशुमन धुमाळ, पोलिस अधिकारी राहुल धस, पीआय सुनील महारी, एपीआय जायपात्रे, पीएसआय पाटील यांनी गुन्हेगार जिल्ह्याची म्हणून हिणवत होते. फडणवीस यांनी क्लीन चीट देण्याची घाई करू नये. किरीट सोमय्या यांना खेड्यात घालण्यासाठी उच्च न्यायालयाने समिती गठीत करून तपास करावा. कारण ही संस्थात्मक हत्या आहे. हे प्रकार थांबले नाही तर संस्थात्मक दहशतवाद निर्माण होईल. आम्ही हे प्रकरण लावून धरणार आहोत.
Web Summary : Sushma Andhare alleges Dr. Sampada Munde's death was institutional murder, demanding ex-MP Ranjitsinh Nimbalkar's investigation. She cites suicide note discrepancies, pressure regarding fitness certificates, and police harassment claims.
Web Summary : सुषमा अंधारे ने आरोप लगाया कि डॉ. संपदा मुंडे की मौत संस्थागत हत्या थी, पूर्व सांसद रणजितसिंह निंबालकर की जांच की मांग की। उन्होंने आत्महत्या नोट विसंगतियों, फिटनेस प्रमाण पत्र के बारे में दबाव और पुलिस उत्पीड़न के दावों का हवाला दिया।