डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2018 02:11 PM2018-08-19T14:11:30+5:302018-08-19T14:12:18+5:30

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेला आरोपी सचिन अंदुरेला प्रथम न्याय दंडाधिकारी ए. एस. मुजुमदार कोर्टाने 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. 

Dr. Narendra Dabholkar murder case, accused Sachin andure will be in CBI custody till August 26 | डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी

googlenewsNext

पुणे : डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेला आरोपी सचिन अंदुरेला प्रथम न्याय दंडाधिकारी ए. एस. मुजुमदार कोर्टाने 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. आरोपीने बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण कुठे घेतले, तसेच या खुनाच्या अनुषंगाने अधिक चौकशीसाठी सीबीआयचे वकील विजयकुमार ढाकणे यांनी 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. 

सीबीआयने सचिन अंदुरेला काल दाभोलकरांचा खून केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. आरोपीला आज पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एटीएसच्या ताब्यात असलेल्या शरद कळसकरच्या चौकशीमध्ये सचिनचे नाव समोर आले होते. दोन दिवसांपूर्वी सीबीआयने सचिनला औरंगाबादमधून ताब्यात घेतले होते. आरोपीला कुठलाही पुरावा नसताना अटक केली असल्याचे सचिनचे वकील प्रशांत सलसिंगीकर यांनी कोर्टात म्हटले.

तसेच पूर्वी सीबीआयने अटक केलेल्या वीरेंद्र तावडेच्या चार्जशीटमध्ये म्हटल्याप्रमाणे सचिनचे वर्णन नाही. तसेच त्या चार्जशीटमध्ये सारंग अकोलकर आणि विनय पवार यांचा दाभोळकरांच्या खुनाशी संबंध असल्याचे म्हटले होते. त्यामुळे सचिनला पुरावा नसताना अटक केल्याचे सलसिंगीकर म्हणाले. हा दावा सीबीआयच्या वकिलांनी खोडून काढला.

Web Title: Dr. Narendra Dabholkar murder case, accused Sachin andure will be in CBI custody till August 26

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.