शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. जयंत नारळीकर यांचं जेष्ठत्व अन् श्रेष्ठत्व सर्वमान्य; आम्ही 'ती' काळजी नक्की घेऊ : छगन भुजबळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 15:26 IST

साहित्य संमेलनासाठी कोणाला बोलवायचे याचा निर्णय साहित्य महामंडळ घेईल.

पुणे :ज्येष्ठ शास्रज्ञ व नाशिक येथे आयोजित करण्यात येणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ.जयंत नारळीकर यांचे ज्येष्ठत्व आणि श्रेष्ठत्व सर्वमान्य आहे. आज आम्ही त्यांना साहित्य संमेलनाचे आमंत्रण दिले.तसेच संमेलनाची रुपरेषा देखील समजावून सांगितली. नारळीकर हे २५ तारखेलाच नाशिकला पोहचतील. त्यांच्या सोयीनुसार संमेलनात सहभागी होतील. त्यांना त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.  पुण्यात छगन भुजबळ यांनी डॉ. जयंत नारळीकर यांच्या राहत्या घरी त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. भुजबळ म्हणाले, भारतीय नागरिक म्हणून मी कलाकारांच्या मतांचा आदर करतो. भारतीय कलाकार सांगताहेत की हा आमच्या देशाचा अंतर्गत मुद्दा आहे. मग तुम्ही तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोला. तुमच्या देशाचा प्रश्न आहे तर आधी तुम्ही बोलते व्हा. इतके दिवस शेतकरी रस्त्यावर, रेल्वे ट्रॅकवर उतरून आंदोलन करत आहेत. त्यावर पण बोलायला पाहिजे असेही भुजबळ यावेळी म्हणाले.

काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद आणि शिवसेनेकडे विधानसभेचे अध्यक्षपद याबाबत चर्चाच आहे. पण याबाबत ज्यावेळी चर्चा थांबेल तेव्हाच खरे ते काय बाहेर येईल. कविता राऊत बाबत राज्यपाल म्हणाले ते योग्य आहे. राऊत यांना काही कागदपत्रांची पुर्तता करायची होती. ती त्या करतायत.

धनंजय मुंडे प्रकरणावर भाष्य करताना भुजबळ म्हणाले,  मुंडे यांच्या विरोधात पुन्हा तक्रार करण्यात आलीय. पण या आधी देखील जी तक्रार देण्यात आली होती ती पुन्हा मागे घेण्यात आली. त्या महिलेच्या विरोधातच अनेकांनी तक्रारी दिल्या .

साहित्य संमेलनासाठी कोणाला बोलवायचे याचा निर्णय साहित्य महामंडळ घेईल. आम्ही त्यामधे ढवळाढवळ करणार नाही. शरद पवारांचा या संमेलनात सत्कार करण्याचा कोणताही प्रस्ताव नव्हता.     

शरजील उस्मानीचे हिंदू समाजाबाबत वापरलेले शब्द चुकीचे होते. कारण आम्हीही मनुवादाविरुद्ध बोलतो. पण याचा अर्थ कोणाच्या भावना दुखावणे असा होत नाही. 

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतलेल्या भेटीवर भुजबळ यांनी सांगितले की, मुख्यमंत्री राज्याचे आहेत. त्यांना कोणीही भेटु शकते. मुनगंटीवार भेटु शकतात, फडणवीस भेटू शकतात.  मुनगंटीवारांना विचारा ते पक्षात येणार का म्हणून असाही टोला त्यांनी यावेळी लगावला. 

टॅग्स :PuneपुणेJayant Narlikarजयंत नारळीकरakhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळChagan Bhujbalछगन भुजबळ