Corona Vaccination In Pune; शहरात मंगळवारी प्रत्येक केंद्रावर २५० लसीचे डोस
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 19:36 IST2021-11-15T19:31:46+5:302021-11-15T19:36:53+5:30
लसीकरणाच्या ऑनलाइन बुकिंगकरिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार आहे

Corona Vaccination In Pune; शहरात मंगळवारी प्रत्येक केंद्रावर २५० लसीचे डोस
पुणे : महापालिकेच्या १८५ केंद्रांवर मंगळवारी १५ नोव्हेंबरला प्रत्येकी २५० कोविशिल्ड लस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तर ससून रुग्णालयासह महापालिकेच्या ११ दवाखान्यांमध्ये प्रत्येकी ५०० कोव्हॅक्सिन लसीचे डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
उपलब्ध लसीच्या साठ्यापैकी १८ वर्षांवरील नागरिकांना ५ टक्के लस ही ऑनलाइन बुकिंगव्दारे, तर ५ टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून मिळणार आहे. तर लसीच्या उर्वरित साठ्यापैकी ४५ टक्के लस ही ८४ दिवस पूर्ण झालेल्यांना ( २४ ऑगस्टपूर्वी लस घेतलेल्यांना) ऑनलाइन बुकिंगव्दारे तर ४५ टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून दुसरा डोस म्हणून मिळणार आहे. तसेच कोव्हॅक्सिन लसीचा १९ ऑक्टोबरपूर्वी पहिला डोस घेतला आहे, त्यांना दुसरा डोस मिळणार आहे. लसीकरणाच्या ऑनलाइन बुकिंगकरिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार आहे.