शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मिळत नाहीत म्हणून कोणत्याही बातम्या काढता का? अजित पवारांचा माध्यमांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2023 19:33 IST

पुण्यात पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या समारोपावेळी महाविकास आघाडीचा एकही नेता उपस्थित नव्हता, यावर अजित पवारांना विचारण्यात आलं.

बारामती- नेते उपस्थित असायला पाहिजेत, असे कुठे म्हटले आहे. कुस्ती बघण्यासाठी देशभरातील शौकीन तेथे उपस्थित असतील तुम्हाला त्याची काय माहिती. स्पर्धेमध्ये कुठे महाविकास आघाडी आणता? स्पर्धा निकोप असली पाहिजे एवढीच अपेक्षा असते. तुम्हाला बातम्या मिळत नाहीत म्हणून कोणत्याही बातम्या काढता का, असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बारामती येथे बोलताना पत्रकारांना केला.

पुण्यात पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या समारोपावेळी महाविकास आघाडीचा एकही नेता उपस्थित राहिला नसल्याचा पत्रकारांनी पवार यांना विचारलेल्या प्रश्नावर पवार यांनीच माध्यम प्रतिनिधींना उलट सवाल केला. पवार म्हणाले, खरोखरच ज्या बातम्यात तथ्य असेल, विचार करण्यासारखी बाब असेल तर जरुर ते विचारण्याचा तुमचा अधिकार आहे. मी अजिबात तो नाकारत नाही. पण उगीचच हा का हजर राहिला नाही, तो का हजर राहिला नाही, असले प्रश्न विचारू नका.

तेथे देश पातळीवरील, राज्य पातळीवरचे कुस्तीगीर संघटनेचे  अध्यक्ष हजर होते. महाराष्ट्र केसरी भरविण्याचे काम ज्या माजी महापौरांनी केले, ते तेथे हजर होते. इतरही अनेक मान्यवर हजर होते. मुख्यमंत्री हजर नव्हते. पण उपमुख्यमंत्री हजर होते. माझ्या माहिती प्रमाणे पुण्यात शनिवारी मुख्यमंत्र्यांना चार-पाच कार्यक्रमांना बोलावले होते. परंतु त्यांना महत्त्वाच्या कामामुळे पुण्यातील कार्यक्रमांना उपस्थित राहता आले नसेल. त्यामुळे त्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी तेथे पाठवले असेल. सरकारमध्ये काम करत असताना असे चालत असते. बारामतीत मला एखाद्या कार्यक्रमाला जाता आले नाही तर मी पक्षातील सहकाºयांना पाठवतो, हे सगळीकडे चालते. यात फार वाईट वाटून घेण्याचे कारण नाही.

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारBaramatiबारामतीNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Kesariमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा