ऑनलाइन नको, शाळेतच शिकवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:11 IST2021-01-25T04:11:59+5:302021-01-25T04:11:59+5:30
या वर्षीर वेळी दहावी पास होऊन कॉलेजमध्ये जाण्यासाठी अनेक उत्सुक असलेले ११ वीचे विद्यार्थी तर अक्षरशः ...

ऑनलाइन नको, शाळेतच शिकवा
या वर्षीर वेळी दहावी पास होऊन कॉलेजमध्ये जाण्यासाठी अनेक उत्सुक असलेले ११ वीचे विद्यार्थी तर अक्षरशः कॉलेज कधी सुरू होणार म्हणून थेट प्राध्यापकांना वारंवार फोन करीत होते. २३ नोव्हेंबरपासून ९ वी, १०, ११ वी आणि १२ वीचे वर्ग सुरू करण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र मार्चपासून नोव्हेंबरपर्यंत केवळ ऑनलाइन शिक्षणाचाच आधार असलेल्या विद्यार्थ्यांना आता प्रत्यक्ष शिक्षकांपुढे बसून शिकताना १०० टक्के आकलन होत आहे. याबाबत स्वतः या विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. उलट शाळा सकाळी ११ ते ५ अशी पूर्णवेळ भरावी. हवेतर आम्ही सकाळी नऊ वाजता शाळेत येऊन अभ्यासक्रम पूर्ण करू, अशी तयारीही विद्यार्थ्यांनी केली आहे.
शाळा यंदा धोरणामुळे भरल्या नाही. त्यामुळे कधी नव्हे ते विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले गेले अजूनही दिले जात आहे. मात्र आता नववी ते बारावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यात आले आहेत. तर पाचवी ते आठवीचे वर्ग भरण्याचा निर्णय झाला आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारचे अध्ययन अनुभव मिळताहेत. या बाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यावर त्यांनी ऑनलाइनपेक्षा प्रत्यक्ष वर्गातील शिक्षणालाच पसंती दर्शविली.
चौकट
ऑनलाइन शिक्षणात विविध अडथळ्यांचा डोंगर
शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई या गावापासून खोल डोंगरभागात असलेली गारकोलवाडी वसलेली आहे. अनेक गावांमध्ये अद्याप नेटची सुविधा पोहोचली नाही. सोबतच गरीब पालकांकडे स्मार्टफोन नाही त्यामुळे ऑनलाइन शिक्षणात विविध अडथळ्यांचा डोंगर उभा होत असून येथील विद्यार्थ्यांना डोंगरावर येऊन हा डोंगर पास करून चिमुकले शिक्षण घेत आहे. मात्र ऑनलाइनपेक्षा विद्यार्थी व पालकांचा कल प्रत्यक्ष वर्गातील शिक्षणाकडे असल्याचे दिसून आले.
शाळा बंद असल्याने अनेक दिवस ऑनलाईन शिवाय पर्यायच नव्हता पण त्यात रेंजचा मोठा अडथळा येत होता. ग्रामीण भागात तर कधी लाईट ही नसायची गरिबीमुळे मला दिवसभर शेतीवरही जावे लागत होते. त्यामुळे मी अनेक तासिका गैरहजर होतो. आता शाळा सुरू झाल्याने मी रोज शाळेत येतो.
- प्रतीक शिंदे
--------
बारावी शास्त्र गारकोलवाडी
मला ऑनलाईन पद्धतीने मिळणारे शिक्षण अजिबात आवडले नाही. आता आमची शाळा सुरू झाली आहे. वर्गात सर्वांसोबत बसून शिकताना शिक्षण घेत असल्यासारखे वाटते अभ्यासक्रमही चांगला समजतो.
- प्रसाद शिंदे, गारकोलवाडी
यावर्षी लॉकडाउनच्या काळात मी मोबाईलवर ऑनलाइन शिक्षण घेतले आता शाळेत जाऊन वर्गात बसून शिकत आहे. या दोन्ही पद्धतींपैकी मला प्रत्यक्ष शाळेतील विद्यार्थ्यांना जास्त चांगले वाटत आहे. यामुळे पूर्णवेळ शाळा भरली पाहिजे तेव्हाच अभ्यासक्रम पूर्ण होईल आम्ही तर सरांना रोज सांगत असतो की आपला अभ्यासक्रम पूर्ण झाला पाहिजे त्यासाठी आम्ही सकाळी नऊ वाजता ही शाळेत यायला तयार आहोत -सार्थक मोहन थोपटे, चिंचोली मोराची