शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

Ajit Pawar: उमेदवारी न मिळाल्यास रुसवे फुगवे, नाराजी दाखवू नका; अजित पवारांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 19:26 IST

दादा यावेळी आमच्या गावचा विचार करा, पक्षाचे प्रमाणिक काम करतोय, भविष्यात देखील करत राहु; उमेदवारांनी घातली अजित पवारांना साद

बारामती : श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडुकीसाठी ३५० पेक्षा जास्त अर्ज आले आहे. त्यातून २१ लोक निवडायचे तर सगळ्यांना समाधानी करता येत नाही. एक दोन दिवसांत प्रमुख लोकांबरोबर बसून नावांची यादी निश्चित करण्यात येईल. परंतु एकदा पॅनेल जाहीर झाल्यानंतर भवानीमाता मंदिरात प्रचाराचा नारळ मी स्वतः फोडणार आहे. सांगता सभेलाही मी येणार आहे. पण मधल्या काळात उमेदवारी नाही मिळाली तर काम करा. रुसवे फुगवे, नाराजी दाखवू नका,असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

बारामती येथे सर्वपक्षीय पॅनलसाठी इच्छुकांच्या मुलाखती उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह क्रिडामंत्री दत्तात्रय भरणे, पॅनलप्रमुख पृथवीराज जाचक, निवडणुक समन्वयक किरण गुजर, माजी अध्यक्ष प्रशांत काटे यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्या. यावेळी पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, कारखान्यासाठी राज्य सरकार, विविध बॅंकांकडून मदत घ्यावी लागेल. ठेव वाढवावी लागेल. भवानीमाता पॅनेलच्या जाचक यांच्या नेतृत्वात २१ संचालक असतील. तेथे काटकसर करावी लागेल. मिटींगला फक्त चहाच घ्यावा लागेल. गाडया वापरता येणार नाहीत. ड्रायव्हर वापरता येणार नाही. हजेरी लावून फिरणाऱ्या कामगारांवर जरब बसवावा लागेल. काही गोष्टी तर मी सांगू शकत नाही इतके प्रकार कारखान्यात घडलेत. उन्हाळ्याची तीव्रता जास्त आहे. आमचा प्रयत्न बिनविरोधचा आहे. पण काहींनी ठरवलेच पॅनेल उभे करायचे तर ती त्यांची मर्जी. पण जेवढे शक्य आहे तेवढे समजून सांगण्याचा प्रयत्न आहे. लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार, त्या खोलात मी जात नाही.  काही काही जण मुद्दाम काहींना हुसकारवून देण्याचा प्रयत्न करतील. आपल्यावर आलेले संकट दूर करण्याचे काम आहे. आपल्या पूर्वजांनी उभे केलेले वैभव जपण्याचे काम आहे. सर्वांनी साथ द्या, सहकार्य करा. छत्रपतीला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखाली काम करू. पूर्ण पाच वर्षे त्यांच्या नेतृत्वात काम होईल. एक नंबर गटाला पाच वर्षे चेअमन अन्य गटांना एकेक वर्षे उपाध्य़क्षपद देणार असल्याचे पवार म्हणाले.

....दादा एकवेळ संधी द्या

मुलाखती दरम्यान इच्छुांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उमेदवारी देण्याची साद घातली. दादा यावेळी आमच्या गावचा विचार करा, पक्षाचे प्रमाणिक काम करतोय, भविष्यात देखील करत राहु. एकवेळ संधी द्या, संधीचे नक्कीच सोने करु. हाक माराल तिथ उभा राहु, घरच्या प्रपंचाप्रमाणे कारखान्याचा प्रपंच करु, अशा शब्दात इच्छुकांनी उमेदवारी मिळण्यासाठी पवार यांना साकडे घातले

....मी जन्मापासून कशालाच शिवलो नाही

मुलाखती दरम्यान एका इच्छुकाने १९८१ पासून पुर्ण निर्व्यसनी असल्याचे अजित पवार यांना सांगितले. त्यावर पवार यांनी १९८१ पुर्वीचे काय, असा मिश्कील प्रश्न विचारला. त्यावर ज्येष्ठांनी थोडे स्वस्तातील मद्यपानाचे व्यसन करत असल्याची कबुली दिली. त्यावर अजित पवार यांनी ‘मी जन्मापासून कशाला शिवलो नाही,असे त्या ज्येष्ठाला सांगितले. यावेळी उपस्थितांमध्ये हशा पिकला.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारBaramatiबारामतीSugar factoryसाखर कारखानेPoliticsराजकारण