शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या संकटात तरी राजकारण करू नका; महापौरांनी दिला सबुरीचा सल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 19:33 IST

राज्यात या तीनही पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार असून मागील ४० दिवसात ''हे शहराध्यक्ष'' मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी का बोलले नाहीत..

ठळक मुद्देशिवसेना - काँग्रेस - राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षानी घेतली होती पत्रकार परिषद

पुणे : सध्याचा काळ कठीण आहे. वैश्विक महामारी असलेल्या कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी एकजुटीची आवश्यकता आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी कोरोनाच्या काळात तरी राजकारण करू नये असा सबुरीचा सल्ला महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षांना दिला असून तीनही पक्षांच्या शहराध्यक्षांना तसे आवाहन केले आहे. राज्यात या तीनही पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. तरीही मागील ४० दिवसात हे शहराध्यक्ष मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी का बोलले नाहीत असा सवाल महापौरांनी केला आहे. बुधवारी शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आणि आमदार चेतन तुपे-पाटील यांनी महापालिकेत पत्रकार परिषद घेत यामध्ये महापौर आणि आयुक्त यांच्यामध्ये समन्वय नसल्याचे सांगितले होते. झोपडपट्ट्यांमध्ये कोरोना वाढत असतानाही उपाययोजनांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप केला होता. महापौर ट्विटरवर केवळ टीवटीव् करीत असल्याची टीका केली होती. या टीकेला महापौर मोहोळ यांनी प्रत्युत्तर दिले. शासनाच्या आदेशानुसारच शहरातील लॉक डाऊन शिथिल करण्यात आले आहे. हा निर्णय चुकीचा वाटल्याने आपण त्याला विरोध केला असून पालिका आयुक्तांना हा निर्णय मागे घेण्याची विनंतीही केली आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त हे राज्य शासनाच्या आदेशानुसार काम करीत आहेत. या निर्णयाचा परिणाम पाहायला मिळत असून पुण्यात लाखो लोक रस्त्यावर आले आहेत. हा निर्णय चुकीचा असून त्यामुळे भविष्यात रुग्ण संख्या वाढू शकते. यासंदर्भात तीनही पक्षांचे शहराध्यक्ष राज्य शासनाशी का बोलत नाहीत? आपण स्वत: महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पुणे विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त यांच्याशी सातत्याने संवाद साधत असल्याचे।महापौरांनी स्पष्ट केले. 

पालिका आयुक्तांच्या विरोधात पत्रकार परिषद घेत त्यांचे काम चांगले नसल्याची, त्यांच्यामुळे कोरोना वाढल्याची आणि त्यांना तातडीने राज्य शासनाच्या सेवेत परत बोलविण्याची मागणी या तिन्ही पक्षांच्या गटनेत्यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती. गटनेत्यांच्या या भूमिकेच्या विरोधी भूमिका त्यांच्या पक्षाच्या शहराध्यक्षांनी घेतली आहे. तीनही शहराध्यक्ष आयुक्त चांगले काम करीत असल्याचे सांगत आहेत. हा विपर्यास असल्याचे महापौर म्हणाले. 

टॅग्स :PuneपुणेMayorमहापौरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस