शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

कुणी रायटर देतं का रायटर ? अंध विद्यार्थ्यांची समाजाकडे मदतीची हाक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 19:40 IST

दहावी - बारावीच्या विद्यार्थ्यांना रायटर मिळणे झाले कठीण 

ठळक मुद्देअनेकांनी कोरोनाच्या भीतीपोटी दिला नकार 

अतुल चिंचली- 

पुणे: दहावी - बारावीची परीक्षा तोंडावर आली असताना अंध विद्यार्थ्यांसाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे. दरवेळी महाविद्यालय, विविध संस्थांकडून यांना पेपर लिहिण्यासाठी रायटर मिळवून दिले जातात. पण यंदा दोन महिन्यापासून आतापर्यंत एकही रायटर न मिळाल्याचे अंध विद्यार्थ्यांनी लोकमतला सांगितले आहे. जानेवारी महिन्यात या अंध विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेचा फॉर्म भरला होता. दरवर्षीप्रमाणे या फॉर्मसोबतच त्यांना रायटर मिळण्याबाबतचा फॉर्मही भरून द्यावा लागतो. त्याचप्रमाणे यावर्षी त्यांनी रायटरचाही फॉर्म भरला. मात्र, गेल्या दोन महिन्यापासून एकही रायटर उपलब्ध झाला नाही, असेही ते म्हणाले.

पुणे शहरात आताच्या परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत आहे. त्यामुळे शाळा महाविद्यालये बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार असल्याचे राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांकडून फॉर्मही भरून घेण्यात आले आहेत. शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयात दहावी बारावीची अंध मुले शिकत आहेत. त्यांना पेपर लिहिण्यासाठी रायटरबाबत अटी घालून देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नववीचा विद्यार्थी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अकरावीचा विद्यार्थी रायटर असणे बंधनकारक आहे. सद्यस्थितीत अंध विद्यार्थ्यांना कोरोनामुळे रायटर मिळत नाही.

बीड येथे राहणारा करण अंबाड म्हणाला, पुण्यातील वाडिया महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. दरवर्षी आम्हाला रायटर मिळण्यास अडथळे येत नाहीत. संस्था अथवा महाविद्यालयाच्या मदतीने रायटर मिळून जातात. पण यंदा अनेकांची तयारी नसल्याचे दिसून येत आहे. कोविडमुळे पेपरला तीन तास बसण्याची त्यांची मानसिकता नाही. तसेच त्यांच्या घरातून नकार दिला जात आहे. कॉलेजकडूनही सध्या रायटर शोधण्याचे प्रयत्न चालू आहेत. कोविडमुळे हे कठीण झाले आहे. ......................................एक दीड महिन्यापासून रायटर शोधत आहे. पण कोणच तयार होत नाही. अनेकांनी कोरोनाची कारणे दिली आहेत. आम्ही आमच्या मूळगावी आलो आहोत. त्यामुळे येथून आम्हाला रायटर शोधण्यासाठी फोनवरच संपर्क साधावा लागत आहे. अशा परिस्थितीत लोकांची रायटर होण्याची मानसिकता नसल्याचे दिसून येत आहे. समाजातून आम्हाला रायटर मिळण्याची अपेक्षा आहे.

ऋषीदास शिंदे, अंध विद्यार्थी                          ...............अंध विद्यार्थ्यांसाठी रायटरबाबत हा नेहमीच अनेक प्रश्न उपस्थित होत असतात. त्यातून सर्वत्र कोरोनाची चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. आम्ही अभ्यासवर पूर्णपणे लक्षकेंद्रित केले आहे. पण गेल्या दोन महिन्यापासून रायटर मिळत नाहीयेत. त्यामुळे परीक्षा कशी घ्यावी, असा प्रश्न पडला आहे. कोरोनाच्या परिस्थितीत रायटर मिळण्यासाठी आमची धावपळ सुरू आहे.                            अथांग भंडारी                             अंध विद्यार्थी

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसStudentविद्यार्थीexamपरीक्षाDivyangदिव्यांग