Doctors Sharthy's efforts and three patients in Pimpri became coronas-free | डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न आणि पिंपरीतील तीन रुग्ण झाले कोरोनामुक्त

डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न आणि पिंपरीतील तीन रुग्ण झाले कोरोनामुक्त

पिंपरी: कोरोनाच्या प्रादुर्भावाने सर्वत्र थैमान घातले असताना पिंपरी चिंचवड महापालिकेतील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिका यांच्या पथकाने पहिल्या तीन रुग्णांना जीवनदान दिले. कोरोना मुक्त येते. वायसीसीएम रुग्णालयातील देवदूताचे सर्व स्तरातून कवतुक होत आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेचे संत तुकाराम नगर येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण रुग्णालय आहे. हे रुग्णालय सामान्य, कामगार, कष्ट्करी वर्गासाठी जीवनदायिनी ठरलं आहे. 2009 मध्ये ज्यावेळी भारतात स्वाइन फ्लू आला होता. त्यावेळी पुण्यात थैमान घातले होते. त्यावेळी वायसीएम मधील डॉक्टरांच्या टीमने अत्यत चांगले काम केले होते. या टीम च राज्यसरकारने ही कवतुक केले होते. 

मार्चला पहिली आठवड्यात कोरोना पुण्यात आला त्यावेळी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ पवन साळवे, आरोग्य अधिकारी डॉ अनिल रॉय, महाविद्यालय प्रमुख डॉ राजेश वाबळे याची बैठक झाली आणि कोरोना साठी कोणती टीम असावी अशी चर्चा झाली.त्या नंतर स्वाईन फ्लू च्या कालखंडात काम केलेली टीम ही एक्सपर्ट आहे त्याच्यावरच जबाबदारी देण्याचा निर्णय झाला. आणि वायसीसीएम मध्ये विलगिकरण वॉर्ड तयार करण्यात आला. सुरुवातीला दहा बेडची व्यवस्था करण्यात आली. 11 मार्चला दुबईहून आलेल्या तीन मित्रांना ऍडमिट करण्यात आले. त्याच्या घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पाठविल्यानंतर ते तिघे मित्र कोरोना पाझिटिव्ह आले. मग त्यांना कोरोना उपचारासाठी तयार केलेल्या वार्डात दाखल केले. 14 दिवस या रुग्णावर टीमने दिवस रात्र न पाहता उपचार केले. केवळ उपचारच नाही तर रुग्णाचे मनोदर्य वाढविले आणि ते रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

 कोरोनाचा सामना करणासाठी सज्ज असलेल्या टीममध्ये डॉ विनायक पाटील, डॉ हेमंत सोनी, डॉ किशोर खिलारे, डॉ नरेंद्र काळे, डॉ अक्षय शेवाळे, डॉ अखिल पाटील, परिचारिका टीम प्रमुख शोभा टिळेकर यांचा समावेश आहे. वरिष्ठ, कनिष्ठ अशा डॉक्टर टीम सज्ज आहे.

 

डॉ विनायक पाटील यांनी पहिल्या तीन रुग्णावर कसे उपचार केले याचे अनुभव कथन केले. आणि नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी याबाबत सांगितले.डॉ पाटील म्हणाले, "दुबईहून आलेल्या तीन मित्र उपचारासाठी दिनांक 11 मार्चला पिपरी मधील वायसीसीएम मध्ये आले होते. त्यांचे घशातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी पाठविल. ते पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात तयार केलेल्या विलगिकरन वार्डात दाखल केले. त्यानंतर त्या तिघांना जो त्रास होत आहे त्यांच्यावर उपचार सुरू केले. त्यांना जेवण देणे, दररोज तपासणी करणे, डब्लूएकवो च्या गाईडलाईन नुसार उपचारपद्धती अवलंबली. त्यानंतर यातील।एक रुग्णाची घरातील काही माणसेही पॉझिटिव्ह आली होती. त्याच्यावरही उपचार सुरू होते. या काळात या रुग्णाचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्नही आमच्या टीमने केला. स्वाइन फ्लू च्या कालखंडात असणारा स्टाफ हा च  कोरोनाशी लढा देण्यास सज्ज होता. सगळे डॉक्टर, परिचारिका, बिव्हिजिचे स्वच्छता कर्मचारी यांनी सर्वांनी चांगले काम केले. 14 दिवस उपचार केल्यानंतर त्यांचे घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी दोनदा पाठविलं, ते निगेटिव्ह आले. त्यामुळे या रुग्णांना आज घरी सोडले आहे. मात्र त्यांनी आणखी दोन आठवडे घरीच रहायचं आहे. कोरोनाचे मोठे संकट आपल्या समोर आहे त्यामुळे सर्व नागरिकांनी सरकारच्या सूचनेनुसार घरीच राहायचं आहे. सामाजिक संपर्क टाळायचा आहे. तेव्हाच आपण कोरोनाला हरवू शकू. प्रत्येक नागरिकाने स्वतःची आणि कुटूंबाची काळजी घावी."

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Doctors Sharthy's efforts and three patients in Pimpri became coronas-free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.