बारामतीत डॉक्टरांचा बंद, १७१ जणांचा बंदमध्ये सहभाग  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 02:34 AM2018-01-03T02:34:56+5:302018-01-03T02:35:59+5:30

बारामती शहरात आयएमएच्या डॉक्टरांनी मंगळवारी (दि. २) नवीन येऊ घातलेल्या नॅशनल मेडिकल कौन्सिल विधेयक या जाचक विधेयकाच्या विरोधात बंद पाळला. बारामती शहरातील १७१ डॉक्टरांनी बंदमध्ये सहभाग घेतला. दुपारी ३ वाजता हा बंद मागे घेण्यात आला.

 Doctors in Baramati closed, 171 people participated in the shutdown | बारामतीत डॉक्टरांचा बंद, १७१ जणांचा बंदमध्ये सहभाग  

बारामतीत डॉक्टरांचा बंद, १७१ जणांचा बंदमध्ये सहभाग  

Next

बारामती  - बारामती शहरात आयएमएच्या डॉक्टरांनी मंगळवारी (दि. २) नवीन येऊ घातलेल्या नॅशनल मेडिकल कौन्सिल विधेयक या जाचक विधेयकाच्या विरोधात बंद पाळला. बारामती शहरातील १७१ डॉक्टरांनी बंदमध्ये सहभाग घेतला. दुपारी ३ वाजता हा बंद मागे घेण्यात आला.
आयएमएच्या सर्व सभासद डॉक्टरांनी २ जानेवारी रोजी देशव्यापी बंदची हाक दिली होती.सरकारने मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया ही देशातील वैद्यकीय व्यावसायिक व वैद्यकीय शिक्षण यांचे नियमन करणारी कौन्सिल अन्यायकारक रित्या विरहित करण्याचा व त्या जागी, डॉक्टरांवर तसेच रुग्णांवर अन्यायकारक व लोकशाहीच्या धोरणांना हरताळ फासणाºया नॅशनल मेडिकल कौन्सिलची स्थापना करण्यचा घाट घातला आहे.
हा निर्णय सर्व जनतेसाठी अहितकारक असून डॉक्टरांची व वैद्यकीय शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांची कुचंबणा करणारा आहे. त्याचा आयएमएने एकमुखाने विरोध करीत २ जानेवारीला बंद पाळला, अशी माहिती बारामती आय एम ए चे अध्यक्ष डॉ. संजय पुरंदरे व सचिव डॉ. राहुल संत यांनी दिली.
तर डॉक्टरांच्या व रुग्णांच्या हितास बाधा आणणारे हे नवे कौन्सिल सरकारने आयएमएच्या कोणत्याही प्रतिधींशी सारासार चर्चा न करता आणण्याचे धोरण अतिशय अन्यायकारक असल्याचे आयएमएचे प्रदेश अध्यक्ष डॉ. अशोक तांबे यांनी सांगितले.

बारामती येथील आयएमएचे सचिव डॉ राहुल संत यांनी सांगितले की,बारामती शहरातील १७१ डॉक्टरांनी या बंदमध्ये सहभाग घेतला.याबाबत बारामती शहरातील डॉक्टरांची बैठक सकाळी पार पडली. आयएमएच्या दबावामुळे केंद्र सरकारने विधेयक लोकसभेत सादर केले नाही.हे विधेयक आवश्यक बदलासाठी ‘स्टॅडींग कमिटी’ कडे सपुर्त करण्यात आले.त्यानंतर दुपारी ३ वाजता बारामती शहरातील बंद पाळण्यात आला. मंगळवारी (दि २) सकाळी ६ ते दुपारी ३ पर्यंत नियमित बाह्णरुग्ण सेवा बंद ठेवण्यात आली.३ नंतर ही सेवा पूर्ववत सुरु झाली. बंदमुळे दुपारपर्यंत नियोजित शस्त्रक्रिया स्थगित ठेवण्यात आल्या.मात्र, अत्यावस्थ रुग्ण सेवा, तसेच अतिदक्षता विभाग सेवा नियमित सुरू होती,असे डॉ संत यांनी सांगितले.

Web Title:  Doctors in Baramati closed, 171 people participated in the shutdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.