Pune: १८ बँकांमधील ४१ खात्यांद्वारे सायबर चोरट्याने घातला डॉक्टराला दीड कोटींना गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 06:09 PM2021-11-27T18:09:02+5:302021-11-27T18:10:44+5:30

पुणे : विमा पॉलिसीचे पैसे परत मिळवून देतो, असे सांगून वेगवेगळ्या १८ बँकांमधील ४१ बँक खात्यांवर पैसे पाठविण्यास भाग ...

doctor was robbed 1 crore cyber crime thief 41 accounts in 18 banks | Pune: १८ बँकांमधील ४१ खात्यांद्वारे सायबर चोरट्याने घातला डॉक्टराला दीड कोटींना गंडा

Pune: १८ बँकांमधील ४१ खात्यांद्वारे सायबर चोरट्याने घातला डॉक्टराला दीड कोटींना गंडा

Next

पुणे : विमा पॉलिसीचे पैसे परत मिळवून देतो, असे सांगून वेगवेगळ्या १८ बँकांमधील ४१ बँक खात्यांवर पैसे पाठविण्यास भाग पाडून एका डॉक्टरची तब्बल १ कोटी ४९ लाख ४४ हजार ४०० रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार २०१७ पासून सुरु होता.

याप्रकरणी बिबवेवाडीत राहणाऱ्या एका ५७ वर्षाच्या डॉक्टरांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या डॉक्टरांनी २०१३ मध्ये ३ विमा पॉलिसी उतरवली होती. या पॉलिसीबाबत यांनी चौकशी करताना त्यांना इंटरनेटवर एक नंबर मिळाला. त्यावर त्यांनी संपर्क साधला होता. तो नंबर सायबर चोरट्यांचा होता. त्यानंतर सायबर चोरट्यांनी फिर्यादी डॉक्टरांना वेगवेगळ्या मेल आयडीवरुन तसेच प्रत्यक्ष कॉल करुन संपर्क करत होते.

त्यांना पॉलिसीचे ३ कोटी रुपयांपेक्षा अधिक पैसे परत मिळवून देतो, असे खोटे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांना वारंवार वेगवेगळ्या बँक खात्यावर पैसे भरायला सांगितले. त्यांना प्रत्येक वेळी वेगवेगळी आश्वासने देऊन त्यांना पैसे भरायला भाग पाडले. अशा प्रकारे त्यांच्याकडून सायबर चोरट्यांनी १८ वेगवेगळ्या बँकांमधील ४१ खात्यांमध्ये १ कोटी ४९ लाख ४४ हजार ४०० रुपये भरायला भाग पाडून फसवणूक केली. पोलीस निरीक्षक चिंतामण अधिक तपास करीत आहेत.

फ्लाईटचार्ज म्हणून दिले ३ लाख
या डॉक्टरांना अजूनही सायबर चोरटे हे आपल्याला पैसे मिळवून देतील, यावर विश्वास आहे. मात्र, त्यांची पत्नी, मुलाला ही बाब समजल्यानंतर त्यांनी समजल्यावरही डॉक्टरांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. सायबर चोरट्यांनी त्यांना वेगवेगळी कारणे सांगून त्यापोटी लाखो पैसे उकळले. कोरोनामुळे सर्व व्यवहार बंद आहेत. तुमची कागदपत्रे फ्लाईटने मागवली आहेत, असे एक कारण सांगून त्यांना फ्लाईट चार्ज म्हणून ३ लाख रुपये भरायला सांगितले होते. विशेष म्हणजे त्यांनी त्यावर विश्वास ठेवून ३ लाख रुपये भरलेही

Web Title: doctor was robbed 1 crore cyber crime thief 41 accounts in 18 banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.