शहरं
Join us  
Trending Stories
1
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
2
सावधान! ChatGPT वर तुमची माहिती गुप्तपणे सेव्ह होते; टाळायचे असेल तर या ५ स्टेप्स फॉलो करा
3
अर्ज दाखल करताच अजित पवारांच्या उमेदवाराचा मृत्यू, ३ जणांना रात्री प्रवेश, सकाळी तिकीट; काँग्रेसचे २६ उमेदवार गेले कुठे...?
4
VHT 2025 : महाराष्ट्र संघासाठी संकटमोचक ठरला ऋतुराज! शतकी खेळीसह टीम इंडियातील जागेवरही टाकला रुमाल
5
“राज ठाकरेंच्या जास्त जागा जिंकून याव्यात ही आमची इच्छा, आम्ही बहुमत मिळवू”: संजय राऊत
6
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
7
नववर्षाच्या आदल्या दिवशीच गुड न्यूज; सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, पटापट चेक करा १८, २२, २४ कॅरेटचे दर
8
आयारामांची चांदी! भाजपचे २२, शिंदेसेनेचे १९; निष्ठावंतांच्या नशिबी सतरंज्या उचलण्याचीच वेळ
9
'ताज'चे नाव आता 'जीव्हीके' हॉटेल्सवरून हटणार; टाटा समुहाने संपूर्ण हिस्सा विकला, कोण आहे खरेदीदार?
10
बाबा वेंगा किंवा नास्त्रेदेमस नाही... मायक्रोसॉफ्टची भविष्यवाणी! २०२६ मध्ये या ४० क्षेत्रांतील लोकांच्या नोकऱ्या जाणार...
11
जिभेचे चोचले की निसर्गाचा चमत्कार? जगातला असा एकमेव बेट, जिथे चक्क माती खातात लोक!
12
"आमदार मेहतांच्या घमेंडीमुळे मीरा भाईंदरमध्ये महायुती तुटली"; मंत्री प्रताप सरनाईकांचा घणाघात
13
"तैवानला चीनशी पुन्हा जोडणे हे आमचे ऐतिहासिक ध्येय...", चीनने बेटाच्या सीमेवर रॉकेटने केला बॉम्बहल्ला
14
एबी फॉर्म दिला, जल्लोष झाला अन् तासाभरात उमेदवारी रद्द
15
संप सुरू होण्यापूर्वी Swiggy, Zomato बॅकफुटवर; डिलिव्हरी बॉईजसाठी आली चांगली बातमी
16
पैशांची चणचण, कर्जाचा डोंगर... यूट्यूबवरुन शिकले अन् पती-पत्नीने घरातच छापल्या नकली नोटा
17
VHT 2025 : सरफराज खानचा धमाका! स्फोटक 'सेंच्युरी'सह NZ विरुद्धच्या वनडे मालिकेआधी ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
18
‘अगं, भाजीला काय आणू’... उत्तर येण्यापूर्वीच किंकाळी कानी पडली; पत्नीशी बोलता बोलता प्रशांत शिंदेने सोडला प्राण
19
मुंबईवरून निघालेल्या खासगी बसचा सोलापूर-पुणे महामार्गावर अपघात; वाहनांच्या एक किलोमीटरपर्यंत रांगा
20
'जबाबदारीने काम करायचे नसेल तर घरी बसा'; अजित पवारांचा नेत्यांना इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मांत्रिकास बोलावून रुग्णावर मंत्रोपचार केल्याप्रकरणी डॉक्टरला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 21:54 IST

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारादरम्यान संध्या गणेश सोनवणे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचा भाऊ महेश विष्णू जगताप यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

ठळक मुद्देदीनानाथ मंगेशकर रुग्णालय : १३ मार्चला उघडकीस आला होता प्रकार

पुणे : मांत्रिकास बोलावून रुग्णावर मंत्रोपचार करणा-या डॉक्टराला अलंकार पोलिसांनी अटक केली. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात झालेला हा प्रकार १३ मार्च रोजी उघड झाला होता. डॉ. सतीश शाहुराव चव्हाण (वय ४५, रा. शुक्रवार पेठ) असे अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव असून न्यायालयाने त्याची २ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विशाखा पाटील यांनी हा आदेश दिला.   उतारा करणारा मांत्रिक सचिन सदाशिव येरवडेकर (वय ४८, रा. ३०६, कसबा पेठ) याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. हा सर्व प्रकार २० फेब्रुवारी ते ११ मार्च दरम्यान स्वारगेट येथील चव्हाण नर्सिंग होम आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडला होता. संध्या गणेश सोनवणे असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचा भाऊ महेश विष्णू जगताप (वय २२, रा. भोसरी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सोनवणे यांच्या छातीमधील दुधाच्या गाठी काढण्याचे आॅपरेशन डॉ. सतीश चव्हाण याच्या चव्हाण नर्सिंग होममध्ये करण्यात आले होते. मात्र आॅपरेशन करताना मोठा रक्तस्राव झाला होता. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांचा मृत्यू झाला होता.        दरम्यान सोनवणे मंगेशकर रुग्णालयात असताना सकाळी ७ ते ८.३० ही वेळ यमाची घंटा आहे, असे सांगून त्यांच्या कुटुंबियांना आॅपरेशन करण्यापासून परावृत्त केले. बरे होण्यासाठी सोनवणे यांना मंत्र पठण करण्यास सांगितले. मांत्रिकास बोलावून त्यांच्या उतारा केल्याचे फियार्दीत नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी डॉ. चव्हाण आणि मांत्रिक येरवडेकर यांच्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समुळ उच्चाटन करण्याबाबतच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीनानाथ येथे केलेल्या उपचाराची कागदपत्रे प्राप्त झालेली असून, चव्हाण याने रुग्णावर केलेल्या उपचाराची कागदपत्रे जप्त करण्यासाठी, सोनवणे यांचा मृत्यू निष्काळजीपणामुळे झाला आहे का, त्यांच्या मृत्यूस कोण जबाबदार आहेत, उपचाराच्या वेळी डॉक्टरसोबत कोण नर्स अथवा कर्मचारी होते. याचा तपास करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील संध्या काळे यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने डॉ. चव्हाण याला पोलीस कोठडी सुनावली.

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरDeathमृत्यूCrimeगुन्हाPoliceपोलिस