शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

२७ दिवसांच्या पाण्याचे करायचे काय? पुण्यासमोर संकट उभे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 12:30 AM

गणित जुळून येईना : प्रकल्पात १५६ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा what to do water for 27 days?

पुणे : खडकवासला धरण प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा, पुणे महानगरपालिकेकडून उचलले जाणारे पाणी आणि येत्या १५ जुलैपर्यंत होणारा पाण्याचा वापर याचे गणित जुळून येत नाही. पुणे व परिसरातील नागरिकांसाठी पुढील १८३ दिवसांच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन करायचे आहे. मात्र, धरण प्रकल्पात १५६ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पुणेकरांच्या २७ दिवसांच्या पाण्याचे करायचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

फेब्रुवारी महिन्यात धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेतल्यानंतर पालकमंत्री गिरीश बापट पाणीकपातीचा निर्णय घेणार असल्याचे बोलते जात आहे. त्यामुळे येत्या मार्च महिन्यापर्यंत पुणेकरांवरील पाणीकपातीचे संकट टळले आहे. परिणामी पुणे महापालिकेला मार्चपर्यंत दररोज १३५० एमएलडी (०.०४८ टीएमसी) मिळणार आहे. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदाही जलसंपदा विभागाकडून येत्या १५ जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन केले जात आहे. त्यानुसार जानेवारी महिन्यातील सध्या शिल्लक राहिलेले १८ दिवस, फेब्रुवारीचे २८ दिवस, मार्च महिन्याचे ३१, एप्रिलचे ३०, मे महिन्याचे ३१, जूनचे ३० आणि जुलै महिन्याचे १५ असे एकूण १८३ दिवस पाणी कसे पुरेल, याचा विचार जलसंपदा व पालिका प्रशासनाकडून होणे अपेक्षित आहे.

सध्या तरी पुणेकरांवरील पाणीकपातीचे संकट टळले आहे. त्यामुळे पुणे महापालिकेला येत्या मार्च महिन्यापर्यंत म्हणजेच पुढील ७७ दिवस १३५० एमएलडी पाणी वापरण्यास मिळू शकते. या ७७ दिवसांत पालिकेकडून ३.६९ टीएमसी पाण्याचा वापर केला जाणार आहे. त्यानंतर एप्रिल, मे, जून आणि १५ जुलैपर्यंतचे एकूण १०६ दिवस याच पद्धतीने पाण्याचा वापर सुरू राहिला तर धरणातील ५.०८ टीएमसी पाण्याचा वापर होईल. परिणामी १४ जानेवारी ते १५ जुलैपर्यंत पालिकेकडून ८.७७ टीएमसीएवढे पाणी वापरले जाईल.

खडकवासला धरण प्रकल्पात रविवारी (दि. १३) केवळ १७.०० टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. परंतु, उन्हाळ्यात धरणातील सुमारे २ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होते. त्यामुळे पुढील काळात धरणातील केवळ १५ टीएमसी पाणीच वापरण्यास मिळणार आहे. परंतु, पुढील १८३ दिवसांसाठी पालिकेला ८.७७ टीएमसी पाणी आणि शेतीसाठी रब्बीला ३.५ आणि उन्हाळी आवर्तनासाठी ४ असे एकूण ७.५० टीएमसी पाणी द्यावे लागणार आहे.

त्यामुळे प्राप्त परिस्थितीचा विचार करता सध्या एकूण १६.२८ टीएमसी पाण्याची गरज आहे. मात्र, धरणात केवळ १५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातही आपत्कालीन परिस्थितीसाठी धरणात १ ते १.५ दीड टीएमसी पाणी शिल्लक ठेवावे लागते. त्यामुळे हे पाणी कुठून येणार, असाही प्रश्न निर्माण होत आहे.कोणते २७ दिवस?पुणेकरांचे १३५० एमएलडी पाणी कायम ठेवले जाईल, असे गृहितक मानले तर १८३ दिवस ८.७७ टीएमसी पाणी लागेल. मात्र, शेतीसाठी ७.५० टीएमसी पाणी दिल्यानंतर पुणेकरांना १५६ दिवस पुरेल एवढेच ७.४८ टीएमसी पाणी धरणात शिल्लक राहते. त्यामुळे १८३ दिवसांतून १५६ दिवस वजा केले, तर २७ दिवस राहतात. त्यामुळे या २७ दिवसांसाठी पाणी कुठून आणायचे?महत्त्वाचे मुद्दे :च्धरण प्रकल्पातील रविवारचा (दि. १३) पाणीसाठा १७.०० टीएमसीच्रब्बी आणि उन्हाळी आवर्तनासाठी लागणारे पाणी ७.५० टीएमसीच्उन्हाळ्यात होणारे बाष्पीभवन सुमारे २ टीएमसीच्१५ जुलैपर्यंतच्या १८३ दिवसांसाठी लागणारे पाणी ८.७७ टीएमसीच्मागील वर्षाचा १३ जानेवारी रोजीचा पाणीसाठा २१.१३ टीएमसीच्गेल्या वर्षापेक्षा यंदाधरणात ४.१३ टीएमसी पाणीसाठा कमी

पाण्याचे नियोजन गरजेचेजलसंपदा विभागाने शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी धरणे बांधली आहेत. त्यानुसार दरवर्षी शेतीसाठी आणि पिण्यासाठी किती पाणी दिले जावे, याचे नियोजन विभागातर्फे केले जाते. त्यामुळे शेतीच्या हिश्श्याचे पाणी पुणे शहरातील नागरिकांना पिण्यासाठी देता येणार नाही. पालिकेने उपलब्ध पाण्याचा विचार करूनच टाऊन प्लॅनिंग करणे अपेक्षित आहे. सध्या खडकवासला धरण प्रकल्पात उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याचे तत्काळ योग्य नियोजन केले पाहिजे. जानेवारीत दोन वेळ पाणी आणि एप्रिल, मे महिन्यात पाणीच नाही, याला नियोजन म्हणता येत नाही.- सुरेश शिर्के, माजी सचिव, जलसंपदा विभाग, तथा अध्यक्ष, भारतीय जलसंपत्ती संस्था, पुणे केंद्र.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी