शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"तुम्ही मेलात की तुमच्या बायको, पोरांना...", जयंत पाटलांना उत्तर देताना रुपाली ठोंबरेंचा तोल ढासळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 17:52 IST

सुनेत्रा पवार यांच्यावर अजित पवारांच्या निधनानंतर चौथ्या दिवशीच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावरून टीका झाली. शेकापचे जयंत पाटील यांनीही यावरून टीका केल्यानंतर रुपाली पाटील ठोंबर संतापल्या आणि बोलताना त्यांची जीभ घसरली.

'उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी १५ दिवसांनी घेतला असता, तर काय बिघडले असते', अशी टीका शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली. त्यांच्या या विधानावर रुपाली पाटील ठोंबरे यांनी संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, 'तुम्ही मेल्यानंतर तुमच्या बायको आणि मुलांना सांगा की, तुम्ही मेल्यावर कुठलेही काम करायचं नाही.'

'माझा त्यांना एक फुकटचा सल्ला'

रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या, "राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर, ताराराणी बाईसाहेब, झाशीची राणी यांच्या महाराष्ट्रामध्ये जयंत पाटील असे बोलणार असतील, तर त्यांना माझा एक फुकटचा सल्ला आहे."

"तुम्ही तुमच्या घरातील बायकांना आणि पोरांना एक नियमावली लिहून द्या की, तुम्ही मेले की १० दिवस किंवा वर्षभर कोणतेही कार्य करायचे नाही. हे स्वातंत्र्य तुम्हाला आहे", असे विधान रुपाली ठोंबरेंनी केले. 

'जयंत पाटलांनी मळमळ ओकू नये'

"सुनेत्रा वहिनींबद्दल बोलायचा तुम्हाला अधिकारी तुम्हाला नाही. जयंत पाटील यांचे वक्तव्य गुळसट असून, जयंत पाटील आता शून्य झाले आहेत. जयंत पाटील यांच्या सल्ल्याची महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील महिलांना गरज नाही. त्यांची तेवढी पातळी देखील नाही. जयंत पाटील यांनी आपली मळमळ ओकू नये", अशी टीका रुपाली ठोंबरे यांनी केली. 

अमोल मिटकरीही जयंत पाटलांवर भडकले

आमदार अमोल मिटकरींनीही जयंत पाटलांवर निशाणा साधला. मिटकरी म्हणाले, "विधान परिषदेत मी या व्यक्तीचा प्रचंड आदर करायचो. शेकापची पुरोगामी विचारसरणी यामुळे मी सुरुवात पासून प्रभावित आहे. सभागृहातील भाईंची अभ्यासपूर्ण मांडणी मला नेहमी प्रभावित करत राहिली."

"आज ते सभागृहाचे सदस्य म्हणून नाहीत याची नेहमी खंत वाटायची. आपल्या आयुष्याची सर्व अभ्यासपूर्ण हयात पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झालेल्या सुनेत्रावाहिनींच्या शपथविधी संदर्भात केलेलं वक्तव्य व बुरसटलेल्या विचारधारेची मांडणी, यामुळे या व्यक्तीबद्दल आता घृणा यायला लागली आहे. त्यांची अहंकारी व उन्मत्त भाषा शेकाप पक्षाच्या विचाराला हरताळ फासणारी ठरली", अशी टीका आमदार मिटकरींनी जयंत पाटलांवर केली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rupali Thombare slams Jayant Patil's remark on Deputy CM's oath.

Web Summary : Rupali Thombare criticized Jayant Patil's comments regarding the Deputy CM's oath. She advised him to set rules for his family after his death and questioned his authority to speak about Sunetra Pawar. Amol Mitkari also condemned Patil's statement as arrogant and regressive.
टॅग्स :Sunetra Pawarसुनेत्रा पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण