शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
6
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
7
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
8
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
9
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
10
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
11
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
12
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
13
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
14
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
15
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
16
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
17
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
18
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
19
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
20
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी

पुण्याचा हा इतिहास तुम्हाला माहितीये का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 17:53 IST

पुण्याच्या नावांमध्ये अनेक बदल हाेत गेले. ते बदल नेमके कधी झाले अाणि पुण्याच्या नावांचा प्रवास कसा हाेता जाणून घेऊयात

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्याचे नाव बदलून जिजापूर करावं अशी मागणी जाेर धरत अाहे. भारतातील महत्त्वाचं शहर म्हणून पुण्याला अाेळखलं जातं. मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी तर पुण्याला भारतातील सर्वाेत्तम शहर करण्याची घाेषणा केली अाहे. अशा या पुण्याचा वैभवशाली इतिहास तुम्हाला माहित अाहे का. पुण्याच्या नावांमध्ये अनेक बदल हाेत गेले. ते बदल नेमके कधी झाले अाणि पुण्याच्या नावांचा प्रवास कसा हाेता जाणून घेऊयात - सन 754  :  याकाळी पुण्याचे नाव हे पुण्य-विजय असे हाेते. त्याकाळच्या ताम्रपटांमध्ये असा उल्लेख अाढळताे. 

- सन 993   : या काळी पुण्याचे नाव पुण्य-विजय बदलून पुनवडी असे झाले. 

- सन 1600  :  पुण्याच्या मूळ वस्तीला कसबा पुणे असे नाव हाेते. 

- सन 1637  :  पुणे शहाजीराजांच्या अंमलाखाली, साेमवार व रविवार पेठा वसवल्या गेल्या. 

- सन 1656  :  पुणे शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखाली हाेते. 

- सन 1663  : मंगळवार पेठ वसली. 

- सन 1703  :  बुधवार पेठ वसली. 

- सन 1714  :  पुण्यावर पेशव्यांची सत्ता सुरु

- सन 1730  :  शनिवारवाडा बांधून पुर्ण झाला. 

- सन 1734  : पहिल्या बाजीरावाने शुक्रवार पेठ वसवली. 

- सन 1749  :  पर्वतीवरील देवालय बांधले. 

- सन 1756   :  गणेश व नारायण पेठा वसवल्या. 

- सन 1761  : लकडी पूल बांधण्यात अाला. 

- सन 1769  :  सदाशिव व भवानी पेठा वसवल्या गेल्या. 

- सन 1774  :  नाना, रास्ता व घाेरपडे पेठा वसवल्या. 

- सन 1818  :  इंग्रजी अंमल सुरु, खडकी कटक स्थापना

- सन 1857  :  पुणे नगरपालिकेची स्थापना.

- सन 1869  :  सर डेव्हिड ससून रुग्णालय कार्यान्वित 

- सन 1880  : खडकवासला धरण बांधून पूर्ण 

- सन 1881 ते 1891  : मुठा उजवा कालवा खाेदण्यात अाला. 

- सन 1884  :  डेक्कन काॅलेजची स्थापना

- सन 1885  :  फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना

- सन 1886 : पुणे-मिरज लोहमार्ग सुरू झाला.

- सन 1915 : आर्यन चित्रपटगृह सुरू झाले.

- सन 1919 : पुण्यात भुयारी गटारांची योजना हाती घेण्यात आली.

- सन 1921 : पुण्याला वीजपुरवठा सुरू. नव्या पुलाचे बांधकाम.

- सन 1941 : सिल्व्हर जुबिली मोटर ट्रान्सपोर्टतर्फे नागरी बससेवा सुरू.

- सन 1950 : पुणे महानगरपालिकेची स्थापना. पी.एम.टी.ची विनोदी बससेवा सुरू.

- सन 1952 : पुणे विद्यापीठाची स्थापना.

- सन 1953 : पुणे आकाशवाणी केंद्र सुरू.

- सन 1961 : पानशेत धरण फुटले.

- सन 1973 : सिंहगडावर टी.व्ही. टॉवर सुरू झाला. पुण्यात दूरदर्शन दिसू लागला.

टॅग्स :Puneपुणेhistoryइतिहासshanivar wadaशनिवारवाडा