शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा उद्या निकाल, रिझल्ट कुठे व कसा पाहायचा? A टू Z माहिती
6
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
7
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
8
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
9
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
10
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
11
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
12
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
13
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
14
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
15
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
16
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
17
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
18
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
19
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
20
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस आयुक्तालय करू

By admin | Updated: May 23, 2015 00:42 IST

कोल्हापूरसाठी निर्णय : गृहराज्यमंत्री शिंदे यांची माहिती ; पावसाळी अधिवेशनात प्रस्ताव

कोल्हापूर : कोल्हापूरला पोलीस आयुक्तालय मंजूर करण्यात येईल. त्यासंबंधीचा प्रस्ताव राज्य शासन पावसाळी अधिवेशनात मांडेल, अशी माहिती गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. भाजपच्या राज्य अधिवेशनास उपस्थित राहण्यासाठी शिंदे येथे आले आहेत. सायंकाळी पत्रकारांनी त्यांची भेट घेतली.शिंदे म्हणाले, ‘गुन्ह्यांतील शिक्षेचे प्रमाण वाढले आहे ही बाब चांगली आहे. कोल्हापुरात आता सर्किट बेंच होत आहे. येथे पोलीस आयुक्तालय व्हावे, अशी खूप वर्षांपासूनची मागणी आहे. राज्य शासनाने नुकतेच अकोला येथे पोलीस आयुक्तालय केले आहे. महापालिका असलेल्या शहरांमध्ये पोलीस आयुक्तालय सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे कोल्हापूरलाही पोलीस आयुक्तालय मंजूर करण्यात येईल. महापालिका निवडणुकीतही काही गुंड लोक उतरणार असल्याची पोलिसांची माहिती आहे. या सगळ्याचा विचार करून पोलीस आयुक्तालयाचा प्रस्ताव विधिमंडळासमोर ठेवण्यात येईल.’ ते म्हणाले, ‘हडकोमधून ५०० कोटी रुपयांचे कर्ज घेऊन राज्यभरातील पोलिसांना निवासस्थाने देण्यात येणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात त्यासाठी २९८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पोलिसांवर सध्या कामाचा प्रचंड ताण आहे. राज्यभरात सध्या २ लाख १९ हजार पोलीस कर्मचारी आहेत; परंतु गुन्ह्यांचे प्रमाण सगळीकडे वाढल्याने नव्याने ६० हजार पदे पाच टप्प्यांत भरण्यात येणार आहेत. त्यातील दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. आॅक्टोबरनंतर १२ हजार पोलीस कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे, असे गृहराज्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)कोल्हापूर पोलीस दल दृष्टिक्षेपात..पोलीस अधीक्षक ०१अतिरिक्त पोलीस अधीक्षक ०२पोलीस उपअधीक्षक ०७पोलीस अधिकारी १२७पोलीस कर्मचारी २४००जिल्ह्यातील पोलीस ठाणी २९प्रतिदिन दाखल होणारे गुन्हे १० ते १५वर्षाला दाखल गुन्ह्यांचे प्रमाण ४५००सीसीटीव्हीचा प्रस्ताव नाहीकोल्हापुरात प्रत्येक चौकात बसविण्यात येणाऱ्या सीसीटीव्हीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून गृहविभागाकडे पाठविण्यात आलेला नाही. त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून तरतूद होत नाही. शासनाकडूनच त्यासाठी निधी देता येईल. परंतु, त्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवावा, असे गृहराज्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.