"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 15:51 IST2026-04-06T15:49:31+5:302026-04-06T15:51:53+5:30
बारामतीच्या सुरक्षिततेसंदर्भात बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, "दादांच्या नंतर सर्वांमध्ये संभ्रम आहे की, आता आमचे कसे होणार? पण दादा असताना सुरक्षिततेसंदर्भात बारामतीची जी ओळख निर्माण झाली आहे, ती तशीच कायम राहील याची खात्री बाळगा."

"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
माझ्यासाठी केवळ पार्थ आणि जय हेच माझे कुटुंब नाही, तर संपूर्ण बारामती माझे कुटुंब आहे आणि प्रत्येक बारामतीकर माझ्या कुटुंबाचा सद्सय आहे. या कुटुंबाच्या विकासासाठी मी आयुष्यभर झटत राहील, हा माझा शब्त आहे. दादांच्या अचानक जाण्याने अनेक कार्यकर्त्यांचे मनोबल खचले. पण काळजी करू नका. एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही. दादांचा जनता दरबार यापुढेही तसाच सुरू राहील. लोकांची कामे पूर्ण होणे हीच दादांना खरी श्रद्धांजली आहे, असा शब्द आणि विश्वास सुनेत्रा पवार यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला. त्या बारामती येथे विधानसभा पोट निवडणुकीचा अर्ज भरण्यापूर्वी आयोजित पक्षाच्या मेळ्याव्यात बोलत होत्या.
गुंडगिरी, खंडणी, बेकायदेशीर प्रकाराला कदापी थारा मिळणार नाही -
बारामतीच्या सुरक्षिततेसंदर्भात बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, "दादांच्या नंतर सर्वांमध्ये संभ्रम आहे की, आता आमचे कसे होणार? पण दादा असताना सुरक्षिततेसंदर्भात बारामतीची जी ओळख निर्माण झाली आहे, ती तशीच कायम राहील याची खात्री बाळगा." एवढेच नाही तर, "शहरात गुंडगिरी, खंडणी, बेकायदेशीर प्रकाराला कदापी थारा मिळणार नाही. कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या जातील. त्यामुळे आपण सर्वांनी कसल्याही प्रकारची काळजी करण्याचे कारण नाही. असा विश्वासही सुनेत्रा पवार यांनी यावेळी बारामतीकरांना दिला.
अजित दादांचा एकही शब्द खाली पडू देणार नाही -
"पवार साहेबांनी बारामतीला विकासाचा दृष्टिकोण दिला आणि अजित दातांनी त्यात रंग भरले आणि जागतिक दर्जाकडे नेले. आपल्या बारामतीची प्रतिष्ठा जराही कमी होऊ देणार नाही, असे वचन मी बारामतीकरांना देते. बारामती तालुकाहा जगातील सर्वात विकसित आणि सर्वात प्रगत तालुका बनवणे हे दादांचे स्वप्न नव्हते तर एक ध्यास होता. त्यांना बारामती हे जागतिक दर्जाचं शहर बनवायचं होतं. मात्र त्यांना नियतिने आपल्यातून नेले. दादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही. हे त्रिवार सत्य आहे. मात्र, त्यांचा विकासाचा विचार पुढे नेण्याचा निर्धार मात्र मी केला आहे. ते शब्दाला जागणारे होते. त्यांचा एकही शब्द खाली पडू देणार नाही. त्यांना साक्षिला ठेऊनच मी तुम्हाला हे वचन देते," असेही सुनेत्रा पवार यावेळी म्हणाल्या.