शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

तत्कालीन सरकारचा खाेटेपणा उघड हाेऊ नये म्हणून काेरेगाव भीमाचा तपास 'NIA'कडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 17:34 IST

काेरेगाव भीमा प्रकरणाचा तपास 'एनआयए' कडे दिल्याने काेर्टात जाण्याचा निर्णय माजी न्यायमूर्ती बी. जी. काेळसे पाटील यांनी घेतला आहे.

पुणे : तत्कालीन सरकारने केलेला खाेटा तपास उघड हाेऊ नये म्हणून काेरेगाव भीमाचा तपास 'एनआयए'कडे देण्यात आल्या असल्याचा आराेप माजी न्यायमूर्ती बी. जी. काेळसे पाटील यांनी केला आहे. तसेच या विराेधात आपण काेर्टात जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

पुण्यात आयाेजित पत्रकार परिषदेत काेळसे पाटील यांनी हा आराेप केला. यावेळी त्यांनी तत्कालीन फडणवीस सरकारवर देखील जाेरदार टीका केली. काेळसे पाटील म्हणाले, काेरेगाव भीमा प्रकरणात एल्गार परिषदेचा तपास तत्कालीन सराकरने पूर्ण करुन चार्जशीट काेर्टात दाखल केली. असे असताना आता हा तपास 'एनआयए'कडे देण्यात आला आहे. त्यामुळे आता पुन्हा 'एनआयए' तपास करुन चार्जशीट दाखल करणार. तत्कालीन सरकारने केलेला खाेटा तपास उघड हाेऊ नये यासाठी हे प्रकरण राज्य सरकारकडून काढून एन आयकडे देत हे प्रकरण पुढे ढकलण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. संभाजी भिडे आणि मिलिंद एकबाेटे यांना वाचविण्यासाठी हे सर्व चालू असल्याचेही काेळसे पाटील यावेळी म्हणाले. 

केंद्राच्या मनात वेगळीच भीती काेरेगाव भीमा NIA चाैकशीवर शरद पवार यांना संशय 

एल्गार परिषदेचा तसेच काेरेगाव भीमा येथील दंगलीचा संबंध नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सुधीर ढवळे वगळता एल्गार प्रकरणी इतर अटक केलेल्यांना आपण भेटलाे देखील नसल्याचे ते म्हणाले. तसेच संभाजी भिडे आणि मिलिंद एकबाेटे दंगली संदर्भात बैठका घेत असल्याचे तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहित हाेते. जर त्यांना याबाबत माहिती नसेल तर त्यांनी इंटेलिजन्स ब्युराेकडून माहिती का नाही घेतली असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. विश्वास नांगरे पाटील यांनी नेमलेल्या समितीमध्ये देखील भिडे आणि एकबाेटे यांना दाेषी ठरवल्याचे ते म्हणाले. तत्कालिन सरकारने खाेटे पुरावे तयार करुन एल्गार परिषदेच्या अनुषंगाने गुन्हे दाखल केल्याचेही ते यावेळी म्हणाले. 

...त्यामुळे एल्गारवर गुन्हा दाखल केल्याची शक्यता  2002 च्या दंगलीची चाैकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या आयाेगामध्ये पी. बी. सावंत हाेते.  माेदी आणि शहा यांना दंगलीसाठी कारणीभूत ठरवून त्यांना कुठल्याही संविधानिक पदावर ठेवून नये असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे एल्गार परिषदेच्या आयाेजनात सावंत असल्याने सरकारने एल्गारला टार्गेट केले असण्याची शक्यता काेळसे पाटील यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारElgar morchaएल्गार मोर्चाPuneपुणेNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा