शहरं
Join us  
Trending Stories
1
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
2
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
3
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
4
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
5
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
6
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
7
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
8
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
9
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
10
Nitin Nabin: चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत?
11
सिडनी येथे जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; दोन हल्लेखोर ताब्यात, १० पर्यटकांचा जीव घेतला
12
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
13
IND vs SA T20I : टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हममधून जसप्रीत बुमराह OUT; कारण...
14
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
15
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
16
पीएम सूर्य घर : मोफत वीज योजनेसाठी कसा करायचा ऑनलाईन अर्ज? सोपी आहे पद्धत, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
17
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
18
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
19
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
Daily Top 2Weekly Top 5

कपात करणार नाही, सांगत आठवड्याला पाणीपुरवठा बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 02:30 IST

पुणेकरांच्या हक्काचे एक थेंबही पाणीकपात करू देणार नाही, असे सत्ताधारी भाजपाकडून वारंवार सांगितले जात असताना महापालिका प्रशासनाकडून दर आठवड्याला पाणीपुरवठा बंद ठेवून पुणेकरांची खरोखर चेष्टा सुरू आहे.

पुणे : पुणेकरांच्या हक्काचे एक थेंबही पाणीकपात करू देणार नाही, असे सत्ताधारी भाजपाकडून वारंवार सांगितले जात असताना महापालिका प्रशासनाकडून दर आठवड्याला पाणीपुरवठा बंद ठेवून पुणेकरांची खरोखर चेष्टा सुरू आहे. गेल्या २१ दिवसांत सहा दिवस शहरातील पाणीपुरवठ्याचा बट्ट्याबोळ झाला आहे. प्रशासनाकडून दर आठवड्याला शहराली सर्व जलकेंद्रांवर एकाच वेळी पंपिंग, विद्युती व दुरुस्तीच्या कामांसाठी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. यामुळे शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.पाटबंधारे विभागाकडून वारंवार करण्यात येणाऱ्या कारवाईनंतर महापालिकेतील सत्ताधारी भाजपाकडून पुणेकरांचे हक्काचे एक थेंब ही पाणीकपात करू देणार नाही, असे स्पष्ट केले. परंतु गेल्या दीड महिन्यांपासून सातत्याने पंपिंग स्टेशनच्या देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात येत आहे. गेल्या तीन आठवड्यांत तर प्रत्येक आठवड्याला गुरुवारी पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. गुरुवारी एक दिवसपाणीपुरवठा बंद असला तरी शुक्रवारी कमी दाबाने म्हणजे अनेक भागात पाणीपुरवठाच होत नाही.यामुळे गेल्या २१ दिवसांत पुणेकरांना ६ दिवस पाणीकपातीला सामारे जावे लागले आहे. यामुळे शहरामध्ये अघोषित पाणीकपात सुरू असल्याची भावना पुणेकरांकडून व्यक्त केली जात आहे.>कमी दाबाने पाणीशहराला पाणी पुरवठा करणाºया पर्वती जलकेंद्र पंपिंग, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव जलकेंद्र, एसएनडीटी-वारजे जलकेंद्र आणि होळकर पंपिंग स्टेशन येथील विद्युत व पंपिंगविषयक व स्थापत्यविषयक देखभाल व दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत.यामुळे येत्या गुरुवारी (दि. २४) संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी (दि. २५) देखील संपूर्ण शहरात उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.>गुरुवारी या भागाचा पाणीपुरवठा राहणार बंदशहरातील सर्व पेठा, दत्तवाडी, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन जिमखाना, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वती दर्शन, पर्वती गाव, मुकुंदनगर, सहकारनगर, एसएनडीटी परिसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सातारा रस्ता परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर, कर्वे रस्ता, सेमिनरी झोनवरील मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्वरनगर, साईबाबानगर, सर्व्हे क्र. ४२, ४६ कोंढवा खुर्द, पर्वती आणि पद्मावती टँकर भरणा केंद्र.>पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:शृंगी परिसर, बावधन, बाणेर, चांदणी चौक, महात्मा सोसायटी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलरनगर, अतुलनगर, शाहू कॉलनी, सूस, सुतारवाडी, भूगाव रस्ता, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, किष्किंधानगर, रामबाग कॉलनी, डावी-उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज, महात्मा सोसायटी, गुरुगणेशनगर.>लष्कर जलकेंद्रलष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, येरवडा परिसर, वडगाव शेरी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर, मुंढवा, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणीनगर, महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड कॉलनी, गोंधळेनगर, सातववाडी.>वडगाव जलकेंद्रहिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ, कोंढवा बुद्रुक. चतु:शृंगी, एसएनडीटी.