शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

खासगी क्लासेस नियंत्रण कायद्याचा पडला विसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 02:30 IST

खासगी क्लासेसच्या मनमानीला आळा घालण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून खासगी क्लासेस नियंत्रण विधेयक तयार करण्यात आले.

पुणे : खासगी क्लासेसच्या मनमानीला आळा घालण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून खासगी क्लासेस नियंत्रण विधेयक तयार करण्यात आले. हे विधेयक शासनाकडे पाठवून वर्ष उलटले, तरी अद्याप त्यावर शासन स्तरावरून मंजुरीसाठी काहीच हालचाली करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे हे विधेयक बारगळण्याची चिन्हे असून शासनाने समिती स्थापन करण्याचा केवळ फार्स केला असल्याची भावना पालकांकडून व्यक्त केली जात आहे.खासगी क्लासेसची कुठेही नोंदणी केली जात नाही; त्यामुळे त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नाही. विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात शुल्क उकळणे, त्यांना योग्य सोयीसुविधा न देणे, क्लासेसच्या विद्यार्थ्यांसाठी पार्किंगच्या सुविधा नसणे आदी तक्रारी केल्या जात आहेत. मात्र, खासगी क्लासेसबाबत निश्चित कायदा नसल्याने शिक्षण विभागाला काहीच कारवाई करता येत नव्हती. या पार्श्वभूमीवर खासगी क्लासेस नियंत्रण कायद्याचा मसुदा तयार केला. या विधेयकाला विधिमंडळाची मंजुरी घेऊन त्याचे कायद्यात रूपांतर होणे आवश्यक होते; मात्र प्रत्यक्षात त्यावर काहीच कार्यवाही झालेली नाही. शासनाच्या अनास्थेमुळे खासगी क्लासेसचे विधेयक प्रलंबित आहे. खासगी क्लासेस नियंत्रण कायदा करण्यासाठी मोठी प्रक्रिया पार पाडण्यात आली. शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्ष्यतेखाली समितीमध्ये क्लास चालकांच्या प्रतिनिधींचाही समावेश करण्यात आला. क्लासचालकांचे म्हणणे ऐकून घेतले. समितीच्या अनेक बैठका पार पडल्या. त्यानंतर खासगी क्लास नियंत्रण कायद्याच्या मसुद्याला अंतिम स्वरूप दिले.क्लासमधील विद्यार्थिसंख्या निश्चित करून दिली. काही क्लासमध्ये एका वर्गात एकाच वेळी ५०० ते ६०० विद्यार्थी बसत असल्याचे चित्र दिसून येते. त्याला आळा घालण्यासाठी क्लासमधील एका वर्गात किती विद्यार्थी असावेत, याची संख्या निश्चित केली. क्लासचालकांनी एकूण विद्यार्थिसंख्येच्या ५ टक्के गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्यावे, शासनाकडे दर वर्षी परवाना शुल्क भरावे, क्लासच्या विद्यार्थ्यांसाठी पार्किंगची पुरेशी व्यवस्था असावी आदी अनेक चांगल्या तरतुदी या विधेयकामध्ये केल्या गेल्या आहेत. मात्र, या तरतुदी आता कागदावरच राहण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. शासनाकडून खासगी क्लासेस नियंत्रण कायदा करण्यास का टाळाटाळ केली जात आहे, याची विचारणा केली जात आहे.विलंबामुळे विधेयक अडचणीतखासगी क्लास नियंत्रण कायदा समितीचा मसुदा तयार करण्यासाठी शासकीय व अशासकीय अशा एकूण १२ सदस्यांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने कायद्याचा मसुदा तयार करून शासनाकडे पाठविताना विहीत मुदतीमध्ये याचे कायद्यात रूपांतर करावे, असे नमूद केले होते. मात्र, शासनाकडून या विधेयकाला मंजुरी देण्यात विलंब केल्यामुळे हे विधेयक अडचणीत सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.क्लासेसबाबत अनेक तक्रारी; मात्र दाद मागणार कुठे?पुणे शहरात मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षांचे क्लासेस, अ‍ॅकॅडमी सुरू करण्यात आलेल्या आहेत. या क्लासेसमध्ये विद्यार्थी प्रवेश घेताना त्यांच्यावर संपूर्ण शुल्क एकाच वेळी भरण्याची सक्ती केली जाते. एकदा विद्यार्थ्यांकडून शुल्क गोळा झाले, की पुन्हा योग्य प्रकारे सुविधा दिल्या जात नाहीत. या क्लासेसमध्ये माजी विद्यार्थीच शिक्षक म्हणून शिकवायला येतात. त्यांच्याबाबत अनेक तक्रारी आहेत; मात्र त्यासाठी दाद कुठे मागायची, हा प्रश्न आहे. - गणेश भोसले, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा विद्यार्थीक्लासेस नियंत्रण कायदा लवकर व्हावाखासगी क्लासेसवर कुणाचेच नियंत्रण नसल्याने त्याविरुद्ध तक्रार कुठे करायची, हा प्रश्न पालकांसमोर उभा राहतो. पालक संघटनांच्या पाठपुराव्यानंतर खासगी क्लासेस नियंत्रण कायदा करण्याची प्रक्रिया शासनाने सुरू केली होती. मात्र, विधेयकचा मसुदा तयार होऊन अनेक महिने उलटले तरी अद्याप त्यावर काहीच कार्यवाही झालेली नाही. तरी, तातडीने हे विधेयक विधिमंडळात मंजूर करून त्याची अंमलबजावणी सुरू व्हावी. - सुनीता देशमुख, पालक

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र