शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

चुकीची माहिती सोशल माध्यमातून चुकूनही प्रसारित करू नका; ‘डिजिटल सॅनिटाईज’साठी पुणे पोलिसांचा पुढाकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 14:02 IST

कोरोनाच्या संसर्गाने डोकेदुखी आणखी वाढत चालली असून दुसरीकडे नागरिकांच्या बेजबाबदारपणाचा फटका सर्वांना

ठळक मुद्देएखाद्याने चुकीची माहिती शेयर केल्यास त्याला होणारी शिक्षा, त्याचे परिणाम याविषयावर क्लिप नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना सतत आवाहन करून देखील ते ऐकत नसल्याची खंतचुकीची माहिती दिल्यास वाचक, दर्शक यांच्या मनात भीती, शंका, संशयास्पद वातावरण तयार

पुणे : चुकीची माहिती नागरिकांनी चुकीनेही शेयर करू नये यासाठी सध्या सायबर पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे. यात पुणे सायबर पोलिसांनीही पुढाकार घेतला असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे. एखाद्याने चुकीची माहिती सोशल माध्यमातून शेयर केल्यास त्याला होणारी शिक्षा, त्याचे परिणाम याविषयावरील सामाजिक जागृतीपर क्लिप विभागाने प्रसारित केल्या आहेत. हेल्थ सॅनिटाईज होण्याबरोबरच डिजिटल सॅनिटाईज होण्यावर नागरिकांनी अधिक भर द्यायला हवा. असे त्यातून सांगण्यात आले आहे. कोरोनाच्या संसर्गाने डोकेदुखी आणखी वाढत चालली असून दुसरीकडे नागरिकांच्या बेजबाबदारपणाचा फटका सर्वांना सहन करावा लागत आहे. या संचारबंदीच्या काळात नागरिक सर्वाधिक प्रमाणात इंटरनेटचा वापर करू लागले आहेत. केवळ माहिती घेणे इतकाच या मागील उद्देश नसून अनेकजण जाणीवपूर्वक चुकीची माहिती व्हाट्सएप, फेसबुकच्या माध्यमातून हजारो नागरिकांपर्यंत पोचवत आहेत. यावर सायबर विभागाचा वॉच असून चुकीचे वागणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. मागील काही दिवसांत मोठया संख्येने सायबरचे गुन्हे देखील दाखल झाले आहेत. नागरिकांना सतत आवाहन करून देखील ते ऐकत नसल्याची खंत सायबरच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यापुढील दिवसात नागरिकांनी अधिक सतर्क राहावे यासाठी पुणे सायबर पोलिसांनी जनजागृतीसाठी काही व्हिडीओ शेयर केले आहेत. त्यातुन त्यांनी नागरिकांना आता डिजिटल सॅनिटाईज होण्यासाठी आवाहन केले आहे. अनेकांकडून एकापेक्षा अधिक सोशल माध्यमांचा वापर होतो. अशावेळी त्यांनी आपल्या कुठल्याही सोशल अकाऊंटवरून चुकीची माहिती पसरवली जाणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. विशेषत: सोशल माध्यमातून जी माहिती प्रसारित केली जाते ती खरीच असते असे समजू नये. त्याची खात्री करावी. चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये. खातरजमा न केलेली माहिती ही चुकीची व दिशाभूल करणारी आहे हे लक्षात घ्यावे. अशा पद्धतीने कुणी माहिती प्रसारित करत असल्यास ती व्यक्ती एखाद्या उद्देशाने किंवा आपले लक्ष वेधून घेण्यासाठी संबंधित कृती करत असल्याचे सायबर व्हिडिओद्वारे नागरिकांना सांगण्यात आले आहे. 

* तुमच्या चुकीच्या माहितीमुळे काय होऊ शकते ..?आरोग्याची योग्य काळजी घेतली गेली नाही तर जसा आजार होतो त्याप्रमाणे सोशल माध्यमावर चुकीची माहिती दिल्यास वाचक, दर्शक यांच्या मनात भीती, शंका, संशयास्पद वातावरण तयार होते. जे सर्वाकरिता धोकादायक आहे. तसेच त्यातुन राग, ताण आणि नैराश्य येण्याची भीती आहे. चुकीच्या माहितीने मास हिस्तेरिया, सामूहिक ताण, होण्याची भीती आहे. सध्या कोरोनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट असताना सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांनी अधिक सजग राहण्याचे आवाहन पुणे सायबर पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :PuneपुणेSocial Mediaसोशल मीडियाFake Newsफेक न्यूजPoliceपोलिसcyber crimeसायबर क्राइम