शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

अफवांवर विश्वास ठेवू नका, लस सुरक्षित : आयएमए चे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 16:48 IST

राज्यात सर्वत्र गोवर-रुबेला लसीकरण मोहिम सुरू आहे. ही मोहिम सुरू झाल्यानंतर त्याचा काही मुलांना त्रास होत असल्याच्या तक्रारी पालकांकडून येऊ लागल्या आहेत.

ठळक मुद्देलसीकरण मुला-मुलींच्या हिताचेच अनेक पालकांमध्ये लसीकरणाबाबत संभ्रम निर्माण मुलांना लस देण्यास काही पालकांची टाळाटाळ मोहिमेपुर्वी लसीकरणाशी संबंधित सर्वांना आवश्यक प्रशिक्षणही मोहिम जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे सुरू

पुणे : गोवर-रुबेला लसीकरण मोहीम ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी अत्यावश्यक आहे. गोवर, रुबेलामुळे आरोग्यावर होणारा परिणाम अत्यंत घातक आहे. या लसीमुळे हे धोके टाळता येतील. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)ने केले आहे. ही मोहिम मुलांच्या आरोग्याच्यादृष्टीने महत्वाची असल्याचे ‘आयएमए’ने स्पष्ट केले आहे.राज्यात सर्वत्र गोवर-रुबेला लसीकरण मोहिम सुरू आहे. ही मोहिम सुरू झाल्यानंतर त्याचा काही मुलांना त्रास होत असल्याच्या तक्रारी पालकांकडून येऊ लागल्या आहेत. पुण्यातही असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे अनेक पालकांमध्ये लसीकरणाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. काही पालक मुलांना लस देण्यास टाळाटाळ करत आहेत. खासगी डॉक्टरांचा सल्ला घेऊन लस देण्याबाबत विचारणा केली जात आहे. या पार्श्वभुमीवर ‘आयएमए’ने पुढाकार घेत लसीकरणाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. आयएमएच्या महाराष्ट्र शाखेने मोहिमेला पुर्णपणे सहकार्य केले आहे. सर्व २१० शाखा आणि ४३ हजार ९० सदस्य त्यासाठी कार्यरत आहेत.   ‘आयएमए’ने लसीकरणाबाबतची तथ्य आणि मार्गदर्शक तत्वांवर प्रकाश टाकला आहे. त्याद्वारे लसीबाबतचा संभ्रम दुर होण्यास मदत होणार आहे. अशीच मोहिम इतर राज्यांमध्येही यशस्वीपणे राबविण्यात आली आहे. आता ही मोहिम महाराष्ट्रात सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी या मोहिमेला विरोध न करता सहकार्य करण्याची गरज आहे. अशास्त्रीय आणि समाजविघातक अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन आयएमए पुणेच्या अध्यक्षा डॉ. पद्मा अय्यर यांनी केले आहे. ---------------------लसीकरणाची तथ्य व मार्गदर्शक तत्वे -- लसीकरण गरजेचे असून सुरक्षित आहे- लसीचे कोणतेही गंभीर दुष्परिणाम जाणवत नाहीत. गंभीर दुष्परिणाम झाल्याचे दावे अशास्त्रीय आहेत.- पाच टक्क्यांहून कमी मुलांना ताप किंवा लस दिल्याच्या ठिकाणी सुज आल्याचे दिसते- प्रामुख्याने इंजेक्शनच्या भीतीमुळे थकवा, अशक्तपणा किंवा चक्कर आल्यासारखे वाटते. ही लक्षणे गंभीरस्वरूपाची नाहीत.- प्रशिक्षित डॉक्टर्स व नर्सेस सतत मुलांसोबत असतात. मोहिमेपुर्वी लसीकरणाशी संबंधित सर्वांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे. - नियमित लसीकरणामध्ये लस दिली असली तरी ही लस दिल्यास कोणताही धोका नाही. - ही मोहिम जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे सुरू आहे. राजकीय स्वरूपाची मोहिम नाही.-----------------------

टॅग्स :Healthआरोग्यGovernmentसरकारStudentविद्यार्थी