Ashtavinayak Darshan : एसटी बसने स्वस्तात करा अष्टविनायक दर्शन

By नितीश गोवंडे | Published: October 7, 2022 06:43 PM2022-10-07T18:43:50+5:302022-10-07T18:48:38+5:30

पुण्यातून शिवाजीनगर आणि पिंपरी-चिंचवड येथून विशेष बस निघणार आहेत....

Do Ashtavinayak Darshan cheaply by ST bus | Ashtavinayak Darshan : एसटी बसने स्वस्तात करा अष्टविनायक दर्शन

Ashtavinayak Darshan : एसटी बसने स्वस्तात करा अष्टविनायक दर्शन

googlenewsNext

पुणे : अष्टविनायक दर्शनाला जाण्याची अनेकांची इच्छा असते, पण अनेकजण महागलेल्या प्रवास खर्चामुळे जाणे टाळतात. यामुळे एस.टी. महामंडळातर्फे दर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी बसने अष्टविनायक दर्शनाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी पुण्यातून शिवाजीनगर आणि पिंपरी-चिंचवड येथून विशेष बस निघणार आहेत.

दोन दिवसांच्या या अष्टविनायक दर्शनासाठी प्रौढांना शिवाजीनगर ते अष्टविनायक ९९० रुपये, तर लहान मुलांसाठी ५०० रुपये दरात जाता येणार आहे. याप्रमाणेच पिंपरी-चिंचवड ते अष्टविनायक प्रवासादरम्यान प्रौढांना १००५, तर लहान मुलांसाठी ५०५ रुपये तिकीट दर आकारण्यात येत आहे.

यासाठी बस स्थानकावर अथवा www.msrtc.gov.in या संकेतस्थळावरून आरक्षण करता येईल. या दोन दिवसांच्या प्रवासादरम्यान ओझर येथे राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून, प्रवाशांना हा खर्च वैयक्तिक करावा लागणार आहे. तरी भक्तांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी केले आहे.

Web Title: Do Ashtavinayak Darshan cheaply by ST bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.