शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

पुण्यात विसर्जन मिरवणुकीत काही ठिकाणी डीजे सुरु , ढोलपथकांची अरेरावी 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 4:21 PM

गणेश विसर्जन मिरवणुकीत न्यायालयाने डीजेवर बंदी कायम असताना सुध्दा काही ठिकाणी डीजे सुरु असल्याचे प्रकार निदर्शनास आला.

ठळक मुद्देमिरवणुकीत ढोलपथकांची नागरिक, महिला, एव्हाना पत्रकारांना सुध्दा अरेरावीची भाषा व धक्काबुक्की

पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीत न्यायालयाने डीजेवर बंदी कायम असताना सुध्दा काही ठिकाणी डीजे सुरु असल्याचे प्रकार निदर्शनास आला. तसेच मिरवणुकीत ढोलपथकांची नागरिक, महिला, एव्हाना पत्रकारांना सुध्दा अरेरावीची भाषा व धक्काबुक्की करण्यात आल्याचे प्रसंग पाहायला मिळाले. शहरातील उपनगरातील गणेश मंडळांनी न्यायालयाच्या निर्णयाला कात्रजचा घाट दाखवत जोरदार आवाजात डीजे सुरु केला आहे. पोलीस प्रशासनाने डीजे वापरणाऱ्या मंडळावर लक्ष केंद्रित केले आहे. काही वारजे, कोंढवा, कर्वेनगर आदी भागातील डीजे वापरणाऱ्या मंडळावर कारवाई देखील केल्याची माहिती समोर येते आहे. मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुक व ढोलपथकांचे वादन पाहण्यासाठी पुणेकर नेहमी गर्दी करतात. मात्र, यावर्षी डीजेवर बंदी असल्यामुळे ढोल पथकांचेच वर्चस्व मिरवणुकीवर राहणार हे निश्चितच होते. परंतु, काही ढोलपथकाकंडून नागरिक महिला व पत्रकारांनी उर्मटपणे अरेरावीची भाषा वापरण्यात आली. भाविकानाच नव्हे तर पत्रकारांना देखील धक्काबुक्की करण्यात आली. वादनकौशल्य सादर करणाऱ्या ढोलपथकांमधील काहीजण स्वत:ला मिरवणुकीचे स्वयंभू व्यवस्थापक समजू लागले आहेत. मिरवणुकामध्ये महिला, लहान मुले यांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग असताना दुसरीकडे ढोलपथकांचा कमालीचा आततायीपणा पाहायला मिळाला . पोलिसांनी शिस्तीचे पालन करण्याची सूचना देऊन देखील त्यांच्या कृतीत फारसा फरक पडला नाही. एकाच जागी उभे राहून बराच काळ वादन केल्यामुळे प्रमुख रस्त्यावरील चौकात गर्दी होत आहे. नागरिकांना त्या गर्दीतून बाहेर पडणे शक्य होत नसल्याने जिथून जागा मिळेल तिथून बाहेर पडण्याचा रस्ता ते शोधतात. यासगळ्यात ढोलपथके आणि त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले त्यांच्याच कार्यकत्यांचे सुरक्षापथक नागरिकांना बाहेर लोटण्याचे काम करते. यामुळे जागा मिळणे तर अवघड परिणामी चेंगराचेंगरी जास्त होत असल्याचे दिसून आले.

टॅग्स :PuneपुणेGanesh Visarjanगणेश विसर्जनHigh Courtउच्च न्यायालयPoliceपोलिस