शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

आळंदीत लोकसभा निकालानंतर डीजे व फटाके वाजविण्यास बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 17:58 IST

निकालानंतर डीजे वाजवू नये, फटाके फोडू नये तसेच विनापरवाना विजयी मिरवणूक काढू नये

आळंदी: लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीची मतमोजणी व निकाल उद्या (दि.४) जाहीर होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर आळंदी शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आळंदी पोलिसांनी नागरिकांना विविध नियम लागू केले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.              आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके म्हणाले, पोलीस ठाणे आळंदी हद्दीतील सुजाण नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने दिनांक १० मार्च २०२४ पासून ते दिनांक ६ जून २०२४ पर्यंत आदर्श आचारसंहिता अंमलात आहे. संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणूकीचे निकाल मंगळवारी (दि. ४) जाहीर होणार आहे. कोणीही नागरिक सदर निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियाद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप ग्रुप व इतर तत्सम एप्लीकेशनच्या माध्यमांद्वारे कोणत्याही समाजांच्या, जातीच्या, धर्माच्या भावना दुखावतील अशा स्वरूपाच्या पोस्ट, कॉमेंट्स, स्टोरी, स्टेटस, डिजिटल बॅनर असे प्रकार वरील माध्यमांद्वारे करू नयेत. तसेच कोणाचेही विरोधात घोषणाबाजी करू नये.            निकालानंतर डीजे वाजवणार नाहीत, फटाके फोडणार नाहीत. तसेच विनापरवाना विजयी मिरवणूक काढू नये. व्हाट्सअप ग्रुपचे ॲडमिन यांनी दिनांक ३ जून ते दिनांक ६ जून या कालावधीमध्ये त्यांच्या ग्रुपच्या सेटिंगमध्ये 'ओन्ली ऍडमीन' असा बदल करून घ्यावा. जेणेकरून ग्रुप मधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोस्ट ग्रुपवर टाकणार नाहीत. जर ऍडमीन यांनी सेटिंग मध्ये बदल केला नाही व कोणी सदस्याने वादग्रस्त पोस्ट टाकल्याने काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्यासह ग्रुप अॅडमीनला जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही आळंदी पोलिसांनी दिला आहे.

टॅग्स :PuneपुणेAlandiआळंदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४PoliticsराजकारणPoliceपोलिस